मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाड्यात उन्हाच्या झळा अधिक तीव्र, महाराष्ट्रातील आजचा हवामान अंदाज.

 गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा आणि विदर्भ याठिकाणी वाढत्या तापमानामुळे उष्णतेची लाट पसरली आहे. मुंबईत दुपारच्या वेळी ऊन्हाची तिव्रता जाणवते. अनेक शहरात तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सातत्याने तापमान वाढताना दिसत आहे.गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. उष्णता वाढत आहे. तीन दिवस भारतीय हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा अगोदरच दिला होता. मार्च महिन्यातच उन्हाच्या झळा या अधिक तीव्र होताना दिसत आहेत. हवामान सध्या उष्ण आणि दमट असल्याचे बघायला मिळतंय. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा, विदर्भ याठिकाणी ऊन अधिक वाढताना दिसत आहे.

यलो अलर्टही हवामान खात्याकडून देण्यात आला. काही शहरांमध्ये उष्णतेच्या पारा ३८ अंशापर्यंत जाताना देखील दिसलाय.पुण्यात ३६.९ अंशांची नोंद झालीये. दुसरीकडे मुंबईसह, कोकण आणि रायगडमध्येही उष्णता वाढताना दिसत आहे. घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही आव्हान भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलंय. मुंबईमध्ये दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिक जाणवताना दिसतोय. होळीपूर्वीच सूर्य तापताना दिसत आहे. पुढील काही दिवस कोकणात तापमान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.अकोल्यात ३८.८ अंश सेल्सिअसपर्यंत सध्या तापमान पोहोचले. चंद्रपूरमध्ये पारा वाढतोय. मुंबई, ठाणे, पुणे, कोकण आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेची नोंद करण्यात आलीये.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, जालना, नांदेड, हिंगोलीमध्ये देखील उन्हाचा पारा वाढला आहे. होळीच्या दिवशीही पारा वाढण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यापेक्षा एप्रिल आणि मेमध्ये उन्हाच्या झळा अधिक तीव्र असतील.पुण्यातील तापमानात वाढ होऊन ते तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. साताऱ्यात तापमान वाढले असून 21 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये तापमान वाढ झाली असून 40 अंशांपर्यंत हे तापमान पोहोचले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात बहुतांश वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मार्चपेक्षा एप्रिल महिन्यात तापमान अधिक वाढणार असल्याचे स्पष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *