संजय राऊतांच्या निशाण्यावर नितेश राणे, म्हणाले, डबक्यात राहायचे आणि हिंदुत्वाच्या नावाने डराव डराव करायचं.

संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. हेच नाही तर राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा सल्ला देत मंत्र्यांना इतिहासाचे धडे देण्यास सांगितले आहे. यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही जोरदार टीका करताना संजय राऊत हे दिसले आहेत.नुकताच संजय राऊत हे सरकारवर टीका करताना दिसले. संजय राऊत म्हणाले की, धनगर समाज बकरी, मेंढी आणि शेळ्यांना आपल्या मुलांप्रमाणे जपतो. गाईचं शेण खावं हे सावरकरांच्या हिंदुत्वात बसत नव्हते. भारताच्या सैन्यात मुस्लीम सैनिक आहेत. भारताच्या पोलिस दलात देखील मुस्लीम आहेत. aभारताच्या संरक्षण दलात प्रदीप कुरुलकर पण आहेत ना?. त्यामुळे अशी जी लोक भूमिका मांडतात ना…त्यांनी परत एकदा अभ्यास केला पाहिजे. कश्मीरमध्ये शहीद होणारे जास्तीत जास्त पोलिस हे मुस्लीम आहेत, जे अतिरेक्यांशी लढतायंत.

महाराष्ट्रात असतील युद्धभूमीत असतील. मुस्लीम सैनिकांनी प्राणाचे बलिदान देऊन देशाच संरक्षण केले आहे. हा इतिहास आणि वर्तमान तुम्हाला बदलता येणार नाही. काही लोकांना डबक्यातच राहायचे आणि डराव डराव कराचय हिंदुत्वाच्या नावाने. या राज्याची आणि देशाची जनता शाहनी आहे. इतिहास समजून घ्या आणि मगच त्याच्यावर बोला. फडणवीसांनी मंत्र्यांना इतिहासाची धडे द्यावीत, असाही थेट सल्ला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलाय.संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. थेट नितेश राणे यांच्यावरच निशाणा राऊतांनी साधला आहे. राऊत पुढे म्हणाले, या देशात हिंदू मुस्लीम दंगली घडवण्याचा काहींचा कट आहे.

भारत न्यूझीलंड सामना जिंकल्यानंतर काहींनी विशिष्ट भागात जाऊन पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या. मला वाटते की, मुळात हा सामना भारत न्यूझीलंडमध्ये होता. त्यामध्ये मिरवणूका काढून पाकिस्तानाच्या विरोधात घोषणा देण्याची गरज नव्हती.आम्ही जिंकलोय, त्यासाठी तुम्हाला मजिदीसमोर जाऊन वाद्य वाजवणे, मुसलमानांना शिव्या देणे हे करण्याची गरज काय? हे एका विशिष्ट हेतूने केले जात असल्याचाही आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत नितेश राणे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की, जो तो आपल्या प्रेरणेनुसार आणि बुद्धीने बोलत असतो. टोळी युद्धाने हे राज्य आणि देश खतम करायचा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना या देशासाठी काय मिळवायचंय किंवा काय करायचे हे त्यांना अजूनही कळत नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *