रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच यूपीएससीचे केंद्र असल्यामुळे कर्मचाऱ्यांना पथकाकडून मार्गदर्शन करण्यात आले. ९ ते ११ मार्चदरम्यान काही परीक्षा केंद्रांची पाहणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षार्थींनी नवी मुंबईत पनवेल येथे परीक्षा केंद्रासाठी पसंती दिल्यामुळे पनवेलमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्यांदाच पनवेलमध्ये होणार होणार आहे. कोकणातील परीक्षार्थींना सोयीचे ठिकाण म्हणून पनवेलला पसंती दिल्यामुळे पनवेलमध्येही ही परीक्षा घेण्याचे निश्चित झाले असून केंद्रीय लोकसेवा आयोगाचे पथक परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासनासोबत पनवेलच्या तीनदिवसीय दौऱ्यावर आले आहे. एप्रिलमध्ये सुमारे ३ हजार उमेदवार पनवेलमधील ८ केंद्रांवर ही परीक्षा देणार आहेत
मुंबईतील परीक्षा केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेत यूपीएससीची परीक्षा पनवेलमध्ये घेण्यात येणार आहे. आयोगाचे तीनसदस्यीय पथक सध्या पनवेलच्या दौऱ्यावर आहे. प्रांत अधिकारी पवन चांडक यांनी खारघर, पनवेल, कामोठ्यातील २७ केंद्रांचा प्रस्ताव या पथकाला सादर केला होता. एकावेळी १० हजार विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील अशी तयारी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.परंतु एप्रिल २०२५मध्ये सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाणार असल्याचे जवळपास निश्चित करण्यात आले आहे. पनवेलमधील प्रशासकीय भवनात लोकसेवा आयोगाच्या पथकाने सोमवारी बैठक आयोजित केली होती.