उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांना ११२ व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. यशवंतराव चव्हाण यांची विचारसरणी कधीही सोडणार नसल्याचे बोलताना अजित पवार हे दिसले. अजित पवार यांनी राज्याच्या समतोल विकासासाठी बजेट सादर करण्याची मंजुरी मंत्रिमंडळाने दिल्याचेही सांगितले.प्रीतीसंगमावर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले. यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा सोडणार नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले. कायम यशवंतराव चव्हाण यांची विचारसरणी स्मरण करतो. राजकारणात आहे तोपर्यंत यशवंतराव चव्हाण यांची विचारसरणी सोडणार नाहीये, असे पवार म्हणाले आहेत. आज यशवंतराव चव्हाण यांची ११२ वी जयंती आहे. अजित पवार म्हणाले की, अलीकडे दोन्ही बाजूंचे नेते सहन न होणारी स्टेटमेंट देतात. राज्याच्या समतोल विकासासाठी बजेट सादर केले जाते.
पुढे अजित पवार म्हणाले की, बजेट सादर होण्याच्या अगोदर मंत्रिमंडळाची मंजुरी मिळते. कोणीही नाराज नसल्याचे परत एकदा सांगताना अजित पवार दिसले. कोयना धरणग्रस्तांबद्दल भाष्य करताना अजित पवार म्हणाले, की कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीये. दोन्ही बाजूंचे नेते म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्याकडून सहन न होणारी स्टेटमेंट दिली जात असल्याचे बोलतानाही अजित पवार दिसले.गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांबद्दल बोलताना दिसत आहेत. यावेळी अजित पवार यांना धनंजय मुंडे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र, यावेळी अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलणे टाळल्याचे बघायला मिळाले. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सुरूवातीला मागणी होत असताना अजित पवार यांनी राजीनाम्याची चेंडू हा धनंजय मुंडे यांच्याच कोर्टात टाकला होता.