आमदार सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने पंकजा यांच्यावर टीका करत आहेत. पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे काम केले नाही, असा आरोप ते करताना दिसत आहेत. त्यावरच पंकजा मुंडे या बोलल्या आहेत.आमदार सुरेश धस गेल्या काही दिवसांपासून मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जाहिरपणे टिका करताना दिसत आहेत. यासोबतच त्यांनी थेट काही आरोपही केली आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये आष्टीत पंकजा मुंडे यांनी पक्षाचे काम केले नसून अपक्ष उमेदवाराचे काम केल्याचा आरोप हा सुरेश धसांकडून सातत्याने केला जातो. हेच नाही तर पक्षाचे काम न केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, असेही बोलताना मध्यंतरी धस दिसले होते. बीडच्या प्रश्नावर विचारले असता पंकजा मुंडे यांनी मला ते विचारू नका म्हटले होते. यावरही सुरेश धस यांनी टीका केली होती.
आता पंकजा मुंडे या सुरेश धस यांच्याबद्दल बोलताना दिसल्या आहेत. पंकज मुंडे यांनी सुरेश धस यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावा, असे म्हटले आहे. मी भाजपाची राष्ट्रीय नेता असूनही धस थेट आरोप कसे करतात? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना समज द्यावी असे म्हटले. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या एसआयटी चाैकशीची मागणी मी पहिल्यांदा केली, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.विषय कोणताही असो सुरेश धस पंकजा मुंडेंवर टीका करताना दिसतात. मात्र, पंकजा मुंडे या सुरेश धसांबद्दल बोलणे टाळतात. आता पक्षश्रेष्ठींनीच सुरेश धसांना समज द्यावी असे त्यांनी म्हटले. सुरेश धस हे विधानसभा निवडणुकाचा निकाल लागल्यापासून सातत्याने पंकजा यांना टार्गेट करताना दिसतात. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्येही त्यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली. पुण्यात बीडबद्दल विचारले असता त्यांनी बोलणे टाळले होते.