खिर्डी परिसरात निंभोरा पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे बोकाळले

खिर्डी परिसरात निंभोरा पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे बोकाळले

खिर्डी ता.रावेर:-प्रदीप महाराज

अवैद्य गावठी दारू ,पन्नी दारू देशी-विदेशी खिर्डी गावात धाब्यांवर, बस स्टॅण्ड परिसर,पाण्याच्या टाकीकडील परिसर दहा रुपयात पन्नी, दारू खुले आमपणे विकली जातेय याकडे खिर्डी बिटचे पोलीस अधिकारी मुद्दाम कानाडोळा करत असल्याचे निदर्शनात येतेय, निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील दोन नंबरचे धंदे सुरू असल्याची चर्चा काल जोमात सुरू होती.

खिर्डी परिसरात निंभोरा पो.स्टे. हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंदे प्रकरणी प्रशासनाला जाग लवकर येईल का? पोलिस स्थानकांच्या हद्दीत निर्धास्तपणे अवैध धंद्यांचा धुमाकूळ सुरू झाल्याचे चित्र पहाव्यास मिळतेय. रात्रंदिवस पत्तयांचे क्लब , सट्ट्यांच्या पिढ्या तसेच अनधिकृत ढाबे होटेल्सवर बेकायदेशीर विनापरवाना अवैध देशी विदेशी दारुची विक्री केली जात आहे गावागावात गल्ली बोळात गावठी किराणा दुकान सारखे दारुची अड्डे सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे या अवैध धंदेवाईकांची नांवे ठिकाण संबंधि निंभोरा पोलिस स्थानकाचे प्रभारी अधिकारी,बीट पोलिस कर्मचारी यांना माहीत नसतील का?? मग पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करतेय?? कुठे आर्थिक पाणी मुरतेय का??जर नाही तर मग हे अवैध सट्टा पत्ता बेकायदेशीर विनापरवानगी दारु विक्रेते दोन नंबरचे धंदेवाईकांवर कठोर कारवाई का केली जात नाही?? या अवैध धंद्याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देवून अवैध धंदे कायमचे बंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *