साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा 94.12% निकाल

साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा 94.12% निकाल

अनिता युवराज पवार (प्रथम क्रमांक गुण 75.33%)

धरणगाव तालुका प्रतिनिधी : राजु बाविस्कर

गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा- अध्यक्ष डॉ.गिरीश नारखेडे साळवे प्रतिनिधी -(धरणगाव) साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,साळवे येथील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये पवार अनिता योगराज ही विद्यार्थीनी ७५.३३% गुण मिळवून प्रथम आली, तर द्वितीय अश्विनी सोनार हिला ७०.८३% मिळाले आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९४.१२% लागला. आणि किमान कौशल्य विभागाचा ८७.५०% निकाल लागला. या विभागात प्रथम क्रमांक मीना गोरख सिरसाट ( ६८.५०% ) व द्वितीय क्रमांक खाटीक फरजाना शकील ( ६६.५०% ) या विद्यार्थ्यांनी मिळवला.सर्व गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ गिरीश नारखेडे, खजिनदार डॉ. चंद्रकांत नारखेडे, शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. शशिकांत नारखेडे आणि सर्व सदस्य व शाळेचे मुख्याध्यापक ए एस पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *