पारोळा तालुक्यातील महिला तलाठी 25 हजारांची लाच घेताना धुळे एसीबीच्या जाळ्यात

श्रीमती वर्षा रमेश काकुस्ते, तलाठी, मौजे शिवर दिगर, ता. पारोळा, जि. जळगाव, यांना तक्ारदार यांचे कडुन २५,०००/-रु लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य केल्याने त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल.

तकारदार हे मौजे शिवरे दिगर, ता. पारोळा, जि. जळगाव येथील रहिवासी असुन त्यांचा विटभ‌ट्टीचा व्यवसाय आहे. विट उत्त्पादनासाठी त्यांना मातीची आवश्यकता असल्याने मातीची वाहतुक करण्याकरीता त्यांनी श्रीमती वर्षा काकुस्ते, तलाठी मौजे शिवरे दिगर यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडुन गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याकरीता २५,०००/-रू जमा करून घेतले. त्यानंतर तक्रारदार यांनी गौण खनिज परवाण्याची चौकशी करण्याकरीता तलाठी वर्षा काकुस्ते यांची भेट घेतली असता, त्यांनी तक्रारदार यांचेकडे यापुर्वी दिलेल्या पैशांची पावती न देता त्याव्यतिरिक्त २५,०००/-रु लाचेची मागणी केल्याची ला.प्र. विभाग, धुळे कार्यालयात दि. १२.१२.२०२३ रोजी तकार दिली होती.

सदर तक्रारीची दि. १३.१२.२०२३ रोजी पडताळणी केली असता, पडताळणी दरम्यान वर्षा काकुस्ते, तलाठी शिवरे दिगर यांनी तलाठी कार्यालय शिवरे दिगर येथे त्याचदिवशी पुन्हा त्याचे पारोळा येथील शासकीय निवासस्थानी तकारदार यांचेकडे २५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले म्हणुन त्यांचे विरुध्द पारोळा पोस्टे जि. धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री.अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण मोरे, प्रविण पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक मा. श्री. नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *