अवैध वृक्षतोड शेकडो कडुलिंबाचे झाडे तोडून मोठ्या कंपनीमध्ये लाकडांचा ढीग.

अवैध वृक्षतोड शेकडो कडुलिंबाचे झाडे तोडून मोठ्या कंपनीमध्ये लाकडांचा ढीग.

एरंडोल तालुक्यातील वनविभागाच्या ऑफिस जवळ दोन मिनिटांच्या अंतरावर केमिकल कंपनी तसेच वीटभतट्यानसाठी अवैध रीतीने पोहचविले जातात कडुनिंबाचे लाकूड.

वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज… एरंडोल तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध वृक्षतोड होत आहे वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारांमुळे एरंडोल तालुक्यात खुलेआम अवैधरित्या वृक्षतोड होत आहे. कडुलिंब, असे अनेक झाडांची कत्तल करून ट्रॅक्टरने किंवा ट्रकने भरून विनाअडथळा सर्रास पणे‌ केमिकल कंपनी व विटभट्टयांन‌ साठी अवैध रीतीने पोहचविले जातात.


एकीकडे शासन वृक्ष लागवड करण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यावर खर्च करत आहे . दुसरीकडे एरंडोल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हिरवी कंच झाडे कडुलिंब, बाभूळ या झाडांसह कोणतीही परवानगी न घेता सर्रासपणे कापली जात आहे

तसेच चोरांनी एरंडोल तालुक्यात लाकूड तस्करीची सर्वत्र धुमाकूळ घातले आहे, तालुक्यातील, केमिकल कंपनी वीटभट्टींवर बॉयलर साठी पुरविण्यात येतात. असे आजी बाजुच्या नागरिकांन चे म्हणने आहे तरी या कडे आत्ता तरी दुर्लक्षित करणारे अधिकारी कर्मचारी जागे होतील का ?
आणि वृक्षतोड थांबेल का……!

एरंडोल वन विभागाच्या ऑफिस जवळ दोन मिनिटांच्या अंतरावर कमीत कमी हजारो झाडांचे कत्तल करून मोठा साठा साठवलेला आहे तरीही अधिकारी यांच्याकडे का कानाडोळा करतात, एरंडोल येथील एका मोठ्या केमिकल कंपनीमध्ये एका दिवसाआड मोठे वाहन भरून लाकूड आणले जाते तरीही अधिकारी का लक्ष देत नाही?

दुसरी बातमी व्हिडिओ सहित प्रसिद्ध होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *