रामदेव वाडी येथील अपघात हे नशे मुळे झाले आहेत. हे कोणत्याही मुर्खाला कळते.

जळगावमधे दारू, रेती माफियांचा सुळसुळाट!

आमच्याकडे जळगाव जिल्ह्यात दारू विकणारे आमदार आहेत. आणि दारू पिणारे मतदार आहेत. दारू पिऊन मतदान करणाऱ्यांची संख्या किमान वीस टक्के आहे.ही सोय राजीव गांधी यांनी करून दिली आहे.अठरा वर्षा नंतर मतदान.शिक्षण पुर्ण होत नाही, कामधंदा नाही, लग्न नाही अशा वयात खरेच राजकारण कळत असेल का?पन्नास वर्षांत शिक्षक, कारकून, प्रोफेसर, वकील डॉक्टर यांना राजकारण कळले नाही.आणि अठरा वर्षांच्या पोरा पोरींना कसे कळेल?


या वयातील पोरं शिवजयंती, आंबेडकर जयंतीला सर्रास दारू पिऊन नाचतात. दारूची सोय आमदार करतात. म्हणून आता आमदार होण्यासाठी दारू बार आणि हॉटेल टाकले जाते. पोरांना पिण्याचे आणि जेवणाचे कुपन दिले जाते.ही पोरं दिवसभर पुढाऱ्यांच्या मागे मागे फिरतात. आणि संध्याकाळी पुढारी कडून कुपन घेऊन पितात , खातात. उरले सुरले आई बापा ला घेऊन जातात. पोरगं खुश. आई बाप ही खुश. कोण कशाला विरोध करील? जळगाव जिल्ह्यातील सर्वच हाणामारी, खून हे दारू आणि रेती व्यवसाय मधील पोरांचे होत आहेत. आता तर अनेक पुढारी गांजा अफू चरस ची सोय करून देतात. ते हाताळणे सोपे जाते. पुढी दिली कि पोरगं चालले सरळ नदीत रेती भरायला. म्हणून पुढाऱ्यांची पोरं , बिल्डरची पोरं यात जास्त रस घेतात.पुणे आणि जळगाव मधील राम वाडी येथील अपघात हे नशे मुळे झाले आहेत. हे कोणत्याही मुर्खाला कळते.


अपघात झाले. आता पोलिस आणि कोर्ट त्यांच्या कायद्याने कारवाई करतीलच. आपण काय करू शकतो? तर पुन्हा असे होऊ नये म्हणून लोकांना जागृत करू शकतो. मी दारू पितो. मला दारूची चीड नाही. तू दारू पितो.तुला दारूची चीड नाही. तसाच तो दारू पितो.त्याला दारूची चीड नाही. मी दारू पिऊन इतरांना कार ने ठोकतो. तो दारू पिऊन मला कार ने उडवतो.त्यामुळे यात नाविन्य असे काहीच उरले नाही.मी दारूडा. तू बेवडा. आणि आमदार दारूडा बेवडांचा नेता. असे मतदार आणि आमदार जळगाव चा कसा विकास करतील? हे कळायला माणूस शुद्धीवर असला पाहिजे.


महाराष्ट्र जागृत जनमंच हिच मोहीम राबवत आहोत. आपण जर दारूच्या आहारी गेलो नाहीत तर दारू दुकाने वाढणार नाहीत. नवीन कोणी दारू दुकान टाकणार नाही. पण जळगाव मधील माणसे आणि बाया सुद्धा दारू विकणाऱ्या आमदारांचे औक्षण करतात.पाया पडतात. फक्त दहा पंदरा हजारांच्या देणगी साठी ? मला वाटते, नागरिकांचे नैतिक पतन झाले आहे. म्हणून पतीत लोक आमदार निवडून येतात. अवैध धंदे करणारे, चोरी करणारे, भ्रष्टाचार करणारे लोकांकडून कोणत्याही सामाजिक, धार्मिक कामासाठी देणगी घेणे चुकीचे आहे.त्याचा अनिष्ट परिणाम त्या समाजावर, त्या कुटुंबावर होतो. आपली पोरं पोरी बिघडतात.आणि आपण साळसूद पणे विचारतो, आम्ही तर चांगले होतो. तर मग आमची पोरं बिघडली कशी? म्हणे शाळा मास्तर चांगले शिकवत नाहीत. चांगले वळण लावत नाहीत. आमचेच वळण खराब आहे तर पोरांचे कसे चांगले राहाणार?


जळगाव जिल्ह्यातील पुढाऱ्यांकडे जाऊन अभ्यास करा. त्यांचे,बायकोचे, पोरांचे संबंध चांगले नाहीत. कधी जवळ बसून गप्पा करीत नाहीत. कधी एकत्र जेवत नाहीत‌. एक येतो अकराला. दुसरा येतो बाराला. तिसरा तर येतच नाही. हा अनैतिक धंद्याचा परिणाम आहे. यांना आम्ही नेता मानायचे का? जळगाव मधे एका मंदिरात शंकराची प्रतिष्ठापना होती. मी गेलो. रस्त्यात मला शंकर भगवान भेटले. विचारले.देवा, आज तर तुम्ही मंदिरात पाहिजे होते. इकडे कुठे निघालेत? अरे वत्स!गुंड, गुन्हेगार लोकांकडून पैसे घेऊन मंदिर बांधले आहे. आज माणसे जमलीत. पण तो गुंड प्रमुख अतिथी आहे. त्याच्या हातून माझी आरती होणार आहे म्हणे. मला लाज वाटते. त्यापेक्षा मंदिरात न गेलेले बरे!

शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *