आदिवासी पाड्यावरील चौघांचा वादळाने बळी घेतल्यानंतर आता प्रशासनाने येथे सर्वतोपरी सुविधा पुरवण्याचा निर्णय

सातपुड्याच्या कुशीतील दुर्गम भागात असलेल्या थोरपाणी या आदिवासी पाड्यावरील चौघांचा वादळाने बळी घेतल्यानंतर आता प्रशासनाने येथे सर्वतोपरी सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.


तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीतील अतिदुर्गम क्षेत्रातील वन विभागाच्या वनपरिक्षेत्र यावल पश्चिम परिमंडळ वाघझीरा यातील कक्ष क्रमांक १०७ यात वसलेले थोरपाणी पाडा या आदिवासी वस्तीवर दिनांक् २६ मे रविवार रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक अचानक आलेल्या वादळी वार्‍याने चौघांचा बळी घेतला. या पाड्यावरील एका झोपडीत राहणार्‍या कुटुंबातील नानसिंग गुला पावरा वय२८ वर्ष ,पत्नी सोनुबाई नानसिंग पावरा वय२३ वर्ष व त्यांची दोन लहान मुल रतिलाल नान सिंग पावरा वय ३ वर्ष व बालीबाई नानसिंग पावरा वय२ वर्ष यांचा झोपडी कोसळुन गुदमरून करुण अंत झाला. सदरची बातमी मिळताच वनविभागाचे कर्मचारी यांनी तात्काळ रात्रीच्या वादळात रस्त्यावर पडलेली झाडें बाजूला करून घटना स्थळा पर्यंत मदत कार्य पोहचविण्यासाठी चा मार्ग मोकळा केला.


या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊनउप वनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव जमीर शेख यांनी तात्काळ मदत कार्य पोहोचविण्या साठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ विशेष सुचना दिल्या. महसूल व पोलीस प्रशासनासोबत वनविभागाचे पथक देखील घटनास्थळी उपस्थित होते. दि. २७ रोजी स्वतःउपवनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव जमीर शेख हे भुसावळचे आमदार संजय सावकारे ह्यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, डॉ.कुंदन फेगडे, आदिवासी विभागाचे निरिक्षक जावेद तडवी तसेच वनपरिक्षेत्र यावल पश्चिम यातील वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे व कर्मचारी यांचे सह पक्ष क्रमांक १०७ यातील पाडा येथील घटनास्थळी पोहचून संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. तसेच त्या भागात इतरही झोपड्यांचे व घरांचे झालेले नुकसानाची पाहणी केली. घटनास्थळी आदिवासी विकास प्रकल्प यावल चे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी उपस्थित राहुन मयत आदिवासी कुटूंबाच्या अंतविधी साठी तात्काळ ५० हजार रूपयांची मदत मयताचे नातेवाईकांच्या स्वाधिन केले. यावेळी उपस्थित मान्यवर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी या ठिकाणच्या वादळात झालेल्या नुकसानीच्या संपूर्ण भागाची पाहणी केली तसेच गावातील राहणार्‍या आदिवासी बांधवाशी चर्चा करून भविष्यात असे पुन्हा घडू नये म्हणून घ्यावयाच्या उपाय योजने बाबत मार्गदर्शन केले. गावातील लोकांसाठी शासकीय योजनांच्या माध्यमातुन या ठिकाणी पक्की घरे ,प्राथमिक आरोग्य केंद्र आंबापाणी येथे बांधण्याचे प्रयत्न केले जातील जेणे करून सर्व शासकीय सुविधा आदिवासी बांधवांना मिळतील असे आश्वासित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *