यावल तालुक्यातील सर्व आदिवासी नागरिकांना तात्काळ घरकुलाचा लाभ देण्यात यावा, राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर

यावल तालुक्यातील सर्व आदिवासी नागरिकांना तात्काळ घरकुलाचा लाभ देण्यात यावा

वरील विषयांस अनुसरून निवेदन करतो की, यावल तालुक्यात बऱ्याच गांव वस्ती व पाडे या ठिकाणी आदिवासी बांधव राहतात त्या ठिकाणी त्यांना शासनाची कोणतीही मदत आजपावेतो पोहचलेली दिसत नाही. रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली यावल तालुक्यातील एका आदिवासी वस्तीमध्ये थोरपाणी या वस्तीवरील येथे नानसिंग पावरा यांचे मातीचे छत असलेले घर जमीन दोस्त झाले व एकाच परिवारातील चार लोक ढिगाऱ्याखाली दाबले गेले व गुदमरून या चौघांचा मृत्यु झाला. त्याठिकाणी १२० घराची वस्ती आहे तरी एकाही घराला घरकुल मंजुरी का नाही देण्यात आली

अशा यावल तालुक्यात किती आदिवासी पाडे व वस्ती आहेत. मग त्यांना शासन घरकुलाचा लाभ का नाही देण्यात येत आहे. आज एका कुटुंबातील चौघांचा जिव हा शासनाच्या उदासीनतेमुळे गेला असे म्हणावे लागेल. जर जिव गेल्यावर प्रशासनाला जाग येत असेल तर मग अजुन किती कुटुबांचा बळी घेणार आहे. शासन तरी आम्ही याच्या अगोदर म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून निवेदन दिले आहे की, यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांना घरकुलचा लाभ दयावा. तरी आम्ही पुनश्चः निवेदनाद्वारे मागणी करतो आहे की, लवकरात लवकर सर्व यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काची घरके देण्यात यावी अन्यथा भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांना सोबत घेवून आंदोलन करेल याची आपण नोंद घ्यावी,

निवेदन देतेवेळी जनहित राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर, तालुका अध्यक्ष मुकेश बोरसे, तालुका संघटक किशोर नन्नवरे, शहर संघटक गौरव कोळी, तालुका उपाध्यक्ष श्याम पवार, शहर उपाध्यक्ष कुणाल बारी, प्रमोद कोलते,  मनोज माहेश्री, राहुल रुले, कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *