धरणगाव तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पुर्वी आढावा बैठक संपन्न.

धरणगाव तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पुर्वी आढावा बैठक संपन्न.


धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर


धरणगाव – | मान्सून पूर्वी तालुक्यात गाव व शहरी भागात नाल्यांची सफाई करावी जीर्ण इमारत असल्यास त्यांना नोटीस द्यावी, रस्त्याने महामार्गने पडाऊ वृक्ष काढून घेण्याच्या सूचना तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांनी मान्सून पूर्व आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
धरणगाव तहसिल कार्यालयात आज मान्सून पूर्व आढावा बैठक तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत मान्सूनपूर्व नियोजन व तयारी करण्यासंदर्भात उपस्थित संबंधित अधिकारी यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गट विकास अधिकारी धरणगाव पं. स.‌ चे सुशांन्त पाटील मुख्यधिकारी धरणगाव पालिका स्वालिहा धरणगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी पोलिस निरीक्षक धमाळे , धरणगाव पोलिस स्टेशन धरणगाव,पो‌. सोनार , सहा पोलिस निरीक्षक दुरक्षेत्र पाळधी , उप अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग धरणगाव, उपअधीक्षक भुमि अभिलेख धरणगाव , सहा निबंधक सहकारी संस्था धरणगाव, उप अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि‌. धरणगाव , बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ धरणगाव, पशुसंवर्धन अधिकारी धरणगाव, दुय्यम निबंधक धरणगाव, उपअभियंता दूरध्वनी केंद्र धरणगाव,
मंडळ अधिकारी धरणगाव , साळवा, पिंपरी, सोनवद, पाळधी , चांसर, विस्तार अधिकारी सर्व पं. सं.‌धरणगाव उप कोषागार अधिकारी धरणगाव, अभियंता निम्म‌ तापि‌ प्रकल्प जळगाव,

धरणगाव तालुक्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *