मुक्ताईनगर पूर्णा किनारपट्टी मध्ये जेसीबी पोकलॅण्डद्वारे 24 तास गाळ माती उत्खनन सुरु.

मुक्ताईनगर पूर्णा किनारपट्टी मध्ये गेल्या 10 मे पासून उत्खनन करणारे वाहने जेसीबी पोकलॅण्डद्वारे 24 तास गाळ माती उत्खनन केले जात आहे त्यामुळे खामखेडा पूल मुक्ताईनगर या पुलावरील रस्त्यावर ट्राफिक जाम प्रवासाच्या डोळ्यात माती जाऊन आज 29 मे 2024 रोज बुधवार रोजी गाळ वाहतूक करणाऱ्या डंपरने एका अनोळखी व्यक्तीस चीरडले आणि ती व्यक्ती जागी ठार झाली पोलीस ठाणे मुक्ताईनगर गुन्हा नोंद झाला परंतु त्या मयताची अजून ओळख पटलेली नाही उत्खनाची परवानगी आहे केव्हा नाही त्याबद्दल नागरिकांना संभ्रम आहे गेले कित्येक दिवसातून वाळू,माती उत्खन करणारे साधने व वाळू माफिया याच्यावर मुक्ताईनगर पोलीस व तहसीलदार यांचा बिलकुल धाक दिसून येत नाही गेल्या दीड वर्षापासून मनसे गौण खनिज उत्खनन करणारे व वाहतूक करणाऱ्या कारवाई करावी असे मनसे निवेदन दिल्यावरही जिल्हाधिकार्यालय प्रांत कार्यालय भुसावळ मुक्ताईनगर तहसीलदार कारवाई करेल का प्रश्न आहे तहसीलदार वखारे यांनी दिव्य महाराष्ट्र न्युज ला बोलतांना सांगितले की कार्यवाही करू आदेश देऊ अशा भूलथापा देऊन कारभार चालू आहे

मुक्ताईनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे तालुका अध्यक्ष यांचे म्हणणे आहे की उत्खनन करणारे वाहतूक करणारे आधीपासून बरेचसे वाढलेले आहे त्यामुळे रहदारी करणारे प्रवाशांचे निर्दोष जीव जातात या मागची भूमिका आहे या दीड वर्षात ख्याजानागरी एदलाबाद जवळ एक बालकाचा मृत्यू झाला होता एस. एम कॉलेज जवळ बस खाली एक व्यक्ती चिरडली गेली होती वाळू ट्रॅक्टरने सुद्धा लहान मुलीस धडक दिली होती बरेचसे अपघात या रस्त्याने झाले आहे परंतु प्रशासन जागे नाही वारंवार अर्ज करून सुद्धा कारवाई होत नाही असे मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई यांचे म्हणणे आहे कित्येक जीव जाणे बाकी आहे यावर मुक्ताईनगर तहसीलदार जिल्हाधिकारी साहेब जळगाव पोलीस प्रशासन लक्ष देईल का नागरिकांच्या मनात कायम प्रश्न उपस्थित आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *