धरणगावात महाराणा प्रताप जयंती उत्साहात

धरणगावात महाराणा प्रताप जयंती उत्साहात

धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर

धरणगाव येथील सकल राजपूत समाज पंच मंडळातर्फे महाराणा प्रताप सिंग यांची 484 वी जयंती आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली . शहरातील महाराणा प्रतापसिंह मंगल कार्यालयात समाजाचे अध्यक्ष जीवनसिंग बयस, रिटायर पीएसआय मगनलाल बयस, उबाठा शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख विलास महाजन, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भानुदास विसावे ,भाजपचे माजी गटनेते कैलास माळी, डी एस पाटील, विजय महाजन,पप्पू भावे, यांच्यासह राजपूत समाजाच्या पदाधिकाऱ्यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले त्रिवेणी चौक, बालाजी मंदिर चौक, महाराणा प्रताप चौफुली, नगरपालिका कार्यालय, तहसील कार्यालय, आदी ठिकाणी देखील महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले.

आज सकाळी १० वाजता महाराणा प्रतापसिंह मंगल कार्यालयापासून बालाजी मंदिरमार्गे मेन रोड, धरणी चौक, बाजोट मार्गे, महाराणा प्रतापसिंह मंगल कार्यालयापर्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या समारोप मंगल कार्यालयात करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष सतीशसिंह जनकवार तेजेन्द्रसिंह चंदेल, धीरेंद्र पूरभे, ॲड कुलदीपसिंह चंदेल, ॲड हर्षल चव्हाण, पंकज बयस, विजय राजपूत, गोविंदसिंग राजपूत, श्याम चव्हाण, विश्वास बयस, ज्ञानेश्वर जनकवार, शिवाजी पाटील, पराग चव्हाण, गणेश राजपूत, यशपाल चंदेल, रामप्रसाद राजपूत,गौरव चव्हाण, निलेश जनकवार, प्रफुल्ल चंदेल, मनोज जनकवार, मोहित सूर्यवंशी आदी राजपूत समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *