लोहारा सुकी नदीचा घाट फोडतो टाहो. कुणीतरी या घाटाला जीवनदान द्याहो..

लोहारा सुकी नदीचा घाट फोडतो टाहो. कुणीतरी या घाटाला जीवनदान द्याहो..


दक्ष जळगाव प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेर


रावेर तालुक्यातील लोहारा हे सातपुडा पायथ्याशी वसलेले आदिवासी पेसा क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.ह्या गावच्या सुकी नदीच्या घाटाला अनेक वर्षापासून खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे.ह्या घाटातून प्रवास करीत असता अनेकांची डोकी फुटत आहे.अशा ह्या अपघातांना सर्वसामान्य जनता होरपळली जातं आहे.वारंवार ह्या घा टा ची विविध वृत्त पत्रांमध्ये बातम्या प्रकाशित करून देखील सबंधित बांधकाम खात्याच्या अधिकारी .पदाधिकारी.लोकप्रतिनिधी यांनी कुंभकर्णाची झोप घेतली आहे..त्यामुळे या सुकी नदीच्या घाटाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा लोहारा गावकऱ्यांचा आरोप आहे.तरी ह्या घाटात दिवसेंदिवस होणारे अपघात थांबवावे.अशी लोहारा येथील गावकरी व परिसरातील जनतेची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *