पोलिस भरतीला पावसाचा फटका, ‘या’ जिल्ह्यातील मैदानी चाचणी तात्पुरती रद्द.

Police Recruitment :

Beed Police Recruitment: राज्यात सध्या पोलिस भरती सुरु आहे. प्रत्येक जिल्ह्यात ही भरती होत आहे. या भरतीसाठी मोठ्या प्रमाणात तरुणांनी अर्ज केले आहेत. काही जिल्ह्यात मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे.

मात्र पावसामुळे मैदान ओले असल्याने उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच आता एका जिल्ह्यातील मैदानी चाचणी तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. या चाचणीची नवीन तारीख काय असेल ते जाणून घेऊयात…

या जिल्ह्यातील चाचणी रद्द ; बीड जिल्ह्यातील मैदानी चाचणी तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. या भरतीसाठी आज म्हणजेच 24 जून रोजी सकाळी 5.30 वा. शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी परीक्षा घेण्यात येणार होती. यासाछी 1009 उमेदवारांना कवायत मैदान, पोलीस मुख्यालय बीड येथे बोलविण्यांत आले होते. मात्र काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मैदानात पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत चाचणी घेणे शक्य नसल्याचे कारण देत पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी ही चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

या तारखेला होणार चाचणी ;बीड पोलिस दलातील भरतीसाठी होणारी मैदानी चाचणी आता 1 जुलैला होणार आहे. सकाळी 5.30 वाजता या चाचणीला सुरुवात होणार आहे. 24 जून रोजी मैदानी चाचणी असलेल्या उमेदवारांनी 1 जुलै रोजी सकाळी 5.30 वाजता चाचणीला हजर रहावे अशी माहिती बीड पोलिसांकडून देण्यात आली आहे.

17 हजार पदांसाठी 17 लाख अर्ज ;महाराष्ट्र पोलिस दलातील 17 हजार पदांसाठी रिक्त भरती प्रक्रीया सुरु झाली आहे. या पदांसाठी 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. यातून राज्यात असलेले बेराजगारीचे वास्तव समोर आले आहे.

कोणत्या पदासाठी किती जागा? ; महाराष्ट्र पोलिस दलात तुरूंग विभागात शिपाई पदाच्या 1800 जागा शिल्लक आहेत. यासाठी 3 लाख 72 हजार 354 अर्ज आले आहेत. तर बँड्समन पदाच्या 41 जागांसाठी 32 हजार 26 जणांनी अर्ज केले आहेत. चालक पदासाठी 1686 जागा उपलब्ध असून यासाठी 1 लाख 98 हजार 300 अर्ज आले आहेत. तसेच पोलिस शिपाई पदाच्या 9595 जागा शिल्लक असून त्यासाठी 8 लाख 22 हजार 984 अर्ज आले आहेत. शीघ्र कृती दलातील 4 हजार 349 जागांसाठी 3 लाख 50 हजार 592 उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *