लोहारा सुकी नदीवर च्या नविन पुलं उभारण्यासाठी आमदार निवासात दिलं निवेदन….

लोहारा सुकी नदीवर च्या पुला चे वाजले तीन तेरा.गुली लोहारा च्या पुलाचे समाजसेवक हसन तडवी आणि सद्दाम तडवी.यांनी नविन पुलं उभारण्यासाठी आमदार निवासात दिलं निवेदन….

दक्ष जळगाव प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेर

गुली लोहारा. रस्त्यावरील पुलाची दुरावस्था गेल्या आठ ते दहा वर्षापासून फार बिकट झालेले असून हा पूल पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे कमी उंचीचा असून रस्त्याचा संपर्क तुटलेला असतो. याबाबतचे निवेदन बिरसा फायटर्स चे राज्य प्रशिध्दी प्रमुख हसन रूबाब तडवी .आणि समाजसेवक सद्दाम बसारत तडवी नुकतेच आमदार शिरीष चौधरी यांच्या ऑफिस येथे महाराष्ट्र राज्य एन.एस.यु.आय सरचिटणीस धनंजय शिरीष चौधरी यांच्या कडे खिरोदा येथे निवेदन आज रोजी दिले.


या पुलावरून गुली लोहारा येथील शेतकरी व शेतमजूर दररोज शेकडोंच्या संख्येने ये जा करत असत.परंतु हा पूलंच ठेंगना कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात या ठिकाणचा संपर्क तुटलेला असतो.म्हणून येथील शेतकरी व शेतमजूर तसेच वाहन चालक पूलाच्या पाण्यातुन नदीतून नदीच्या तुटलेल्या पुलावरून जिव घेणा प्रवास करत आहे.या ठिकाणी खराब रस्त्यामुळे बऱ्याच वेळा रिक्षा पलटी होणे, मोटरसायकली स्लीप होणे असे छोटे-मोठे अपघात सतत होत असतात.या पुलावरून अवजड वाहने बऱ्याच वर्षांपासून बंद झालेले असून यामुळे शेतकऱ्यांचा तसेच शेतमालासाठी जाणारे-येणारे ट्रक यांचे खूप नुकसान होत आहेत. याबाबत आमदार, खासदार यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन त्वरित या पुलाचे बांधकाम करून शेतकरी व शेतमजूर यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आदिवासी बिरसा फायटर्स संघटनेचे राज्य प्रशिध्दी प्रमुख तसेच समाजसेवक हसन तडवी आणि लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक सद्दाम तडवी.यांनी तसेच गुली.लोहारा. कुसूंबा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. परिणामी वाहनधारकांना या पुलावरून मार्ग काढताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाच्या दोघ साईडचे घाट पन डाबरीकरण पक्के आणि मोठा पुल नविन.उभारण्यासाठी दिले निवेदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *