जळगाव:- विनापरवाना सील बंद पिण्याच्या पाण्याची बाटल्यांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती समजल्यावरुन सदर प्रकारास आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी श्री. शरद म. पवार, सहायक आयुक्त श्री. संतोष कृ. कांबळे व मा.सह आयुक्त,(नाशिक विभाग) श्री सं.भा.नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील एमआयडीसी परिसरातील ढोर मार्केट येथे मे. देवांश सेल्स या पेढीवर धाड टाकण्यात आली.
सदर पेढीकडे आवश्यक अन्न परवाना नसताना सुद्धा जळगाव शहरात व जिल्हयात सील बंद पिण्याच्या पाण्याची बाटल्याची (उत्पादक प्रामुख्याने गुजरात जिल्हयातील ) विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. या पेढी मध्ये 4 लाख 10 दहा ऐंशी किमतीचा पाण्याच्या बाटल्यांचा अन्न सुरक्षा मानके कायदयान्वये साठा जप्त करण्यात आला.
जळगाव जिल्हयातील सर्व अन्न व्यावसाईकांना कळविण्यात येते की, कोणताही अन्न व्यवसाय करण्याआधी अन्न परवाना/नोंदणी प्राप्त करुन घ्यावी असे सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव यांनी ऐका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.