लोहारा सुखी नदीवरील नवीन मोठ्या पुलासाठी निवेदन देण्यात आले

लोहारा सुखी नदीवरील नवीन मोठ्या पुलासाठी निवेदन देण्यात आले

दक्ष जळगाव प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेर

रावेर तालुक्यातील गुली लोहारा सुखी नदीवरील नविन मोठा पुल बांधण्यासाठी लोहारा येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते. समाजसेवक आदिवासी बिरसा फायटर्स संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रशिध्दी प्रमुख हसन रूबाब तडवी. आणि समाजसेवक सद्दाम बसारत तडवी यांनी व्ही. के. तायडे. उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावदा ऑफिस जि.जळगाव तथा मा.तहसीलदार तहसील कार्यालय रावेर जि.जळगाव यांना लोहारा येथील रहिवासी समाजसेवक सूपडू तडवी.सद्दाम तडवी.जब्बार तडवी.याकूब तडवी. सामाजिक कार्यकर्ते सद्दाम बसारत तडवी. बिरसा फायटर्स महाराष्ट्र प्रशिध्दी प्रमुख हसन रूबाब तडवी.यांनी बिरसा फायटर्स च्या निवेदना द्वारे केली आहे सातपुडा पर्वतात आणि काठावर राहाणारे सुखी नदीच्या काठावर राहाणारे लोक परस्पर गावात जाऊन शेतीचे व मोलमजुरीची कामे करतात गुली गावाचे तलाठी कार्यालय.ग्रामपंचायत कार्यालय लोहारा गावातज आहे.

पावसाळ्यात सातपुडा पहाडात पाऊस पडल्यावर झाडे झुडपे पाण्याच्या पुराच्या प्रवाहात वाहून येतात आणि लोहारा सुखी नदीच्या पाईपांन मध्ये अडकून पाणी पुलावरून वाहू लागतो पावसाळ्यात सुकी नदीला पूर आल्यावर लोहारा. गुली. कुसूंबा गावांचा पन संपर्क तुटतो लोहारा गावाची भौगोलिक रचनानूसार काही घरे एका तटावर व काही घरे नदीच्या दुसर्या तटावर आहेत.त्यामुळे गांवातील सरकारी कार्यालयांशी लोकांचा संपर्क तुटतो .नदीला पूर आल्यानंतर यापूर्वी अनेकदा गुराढोरांची जीवीतहानी सुध्दा झालेली आहे. लहान मुलांना शाळेत जाता येत नाही त्याच बरोबर कोणी आजारी पडलेतर दवाखान्यात जाता येत नाही. तरीगावकर्यांची अडचन लक्षात घेऊन तात्काळ सुखी नदीवरील लोहारा येथे नविन मोठापूल बांधण्यात यावा संबंधित अधिकार्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.हीच नम्र विनंती अशा प्रकारे निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *