नेरी येथे घाणीचे साम्राज्य. नागरिकांचे आरोग्य धोख्यात

नेरी येथे घाणीचे साम्राज्य जामनेर : तालुक्यातील नेरी बु. येथील हनुमान गल्ली रमेश कुमावत यांच्या घरापासून ते हिरा शेट कुमावत यांच्या घरापर्यंत असलेल्या गटारी मधून घाण व सांडपाणी मोकळे वाहत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गटारीत साचलेले असुन पावसाच्या पाण्याअभावी साचलेले सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे पाण्यातील किडे अंगणात आल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत आहे.


सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी बऱ्याच वेळा गटारीचे पाहणी केली असून आजपर्यंत कुठल्याही प्रकारची व्यवस्था केली नसुन त्याचप्रमाणे सांडपाण्यामुळे डासांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले असून साथीचे रोग व इतर रोग नागरिकांना तसेच गावातील जनावरांनामध्ये पसरण्याबाबत गावातील सुसज्ज नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *