कोल्हापुरात नरबळी देण्याचा प्रयत्न.सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल.

अघोरी प्रकरणे आणि कृत्यांवर चाप बसवण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा करण्यात आला असताना कोल्हापुरात गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे.

कोल्हापुरातील कौलव गावातल्या एका घरामध्ये चार ते पाच फुटांचा खड्डा खणला होता. या प्रकरणी राधानगरी पोलिसात जादूटोणा कायदा अंतर्गत सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरामध्ये खणण्यात आलेल्या त्या खड्ड्याच्या बाजूला पानविडा, फुल आणि इतर काही गोष्टी आढळल्या.

राज्यामध्ये जादूटोणा कायदा लागू असतानाच कोल्हापुरात ही घटना घडली आहे. घरामध्ये चार ते पाच फुटांच्या खड्ड्याशेजारी मोठमोठ्याने मंत्रोच्चार करणारा, गळ्यात रुद्राक्षांची माळ असणारा साधू बसला होता. शेजारच्यांना हे मंत्रोच्चार ऐकून संशय आला आणि त्यांनी घरात जाऊन पाहिले असता देवघरात त्यांना खड्डा खणल्याचे दिसले. चौकशी केली असता येथे गुप्तधन मिळणार असल्याचे सांगण्यात आलं. प्रश्नांचा मारा केला असता नरबळीचा संशय व्यक्त करण्यात आला.

पोलिसांनी सहा जणांविरोधात सदर प्रकरणी जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद माने असे मुख्य आरोपीचे नाव आहे. येथे नेमका कोणाचा नरबळी दिला जाणार होता, त्यात आणखी कोणाचा हात होता, याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *