बाळासाहेब चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त हिरवा सातपुडा उपक्रम अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम,

बाळासाहेब चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त हिरवा सातपुडा उपक्रम अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम

रावेर प्रतिनिधी : -प्रदीप महाराज

स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांच्या चौदाव्या (१४ व्या) पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त सातपुडा परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हिरवा सातपुडा उपक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमांमध्ये ली ना पाटील आश्रमशाळा, द.न. वांद्रेकर माध्यमिक विद्यालय, गुरुकुल माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पाल येथील विद्यार्थ्यांनी परिसरातील व मध्य प्रदेश सीमेलगत शेरी नाका टेकडीवरती 500 खड्डे खोदून त्या ठिकाणी विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांमध्ये सातपुडा पर्वत रांगांमध्ये मोठ्या प्रमाणावर सापडत असलेले विविध प्रकारचे वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून झाडांची लागवड केली करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने फापडा नीम, चिंच,वड, पिंपळ, शिसव व बेल या वृक्ष झाडांचा प्रामुख्याने समावेश होता.

हिरवा सातपुडा उपक्रम स्वर्गीय मधुकरराव चौधरी साहेबांनी मोठ्या प्रमाणावर गतकाळात राबविला होता. पर्वतरांगांमधील वृक्षतोड थांबावी तसेच पर्यावरणाचा समतोल रहावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आले. सातपुडा विकास मंडळ या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त मागील वर्षापासून हिरवा सातपुडा उपक्रम शिरिष चौधरी (आमदार, रावेर/ यावल विधानसभा) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमास वन विभाग (महाराष्ट्र शासन) यांची मदत होत असून विविध रोपांची उपब्धता करून देत आहेत. भविष्य काळात देखील मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून सातपुडा पर्वता हिरवा करण्याचा मानस आहे या साठी संस्थेचे अध्यक्ष अशोक झांबरे सचिव अजित पाटील यासह युवा नेते धंनजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी कृषी विज्ञान केंद्र पाल चे प्रमुख प्रा. महेश महाजन, रावेर वन प्रादेशिक अधिकारी अजय बावणे, द न वंद्रेकर शाळेचे मुख्याध्यापक भागवत पारधी, गुरुकुल आश्रमशाळा चे मुख्याध्यापक प्रवीण चौधरी, ली ना पाटील आश्रमशाळा, पाल चे मुख्याध्यापक गोविंदा अत्तरदे, डॉ. धीरज नेहेते, अतुल पाटील, संदीप राणे, .शशिकांत ठोंबरे, मिलिंद होले या सह संस्थेचे कर्मचारी, अधिकारी व कार्यकर्ता परिवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *