जलजीवन च्या कामात भ्रष्टाचार,खा. गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन…..

जलजीवन च्या कामात भ्रष्टाचार,खा. गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन…..

नंदूरबार प्रतिनिधी सुरेश बोरसे


नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये जल जीवनच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे त्या कामांची सकल चौकशी करावी तसेच कृषी विभागामार्फत राबवण्यात आलेल्या योजनांमध्येही भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे याची देखील सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी नंदुरबारचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार ऍड. गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांचा सहभागात 16 जुलै रोजी जिल्हा परिषदे समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे .या आंदोलनात शिवसेना शिंदे गट ,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना उबाठा गट यासह मित्रपक्ष सहभागी होणार आहेत. जिल्हा परिषदेत जलजीवनाचा कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून 20 टक्केच कामे झाली आहे परंतु बिले पूर्णपणे काढण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी व गावकऱ्यांनी निकृष्ट कामाची या संदर्भात तक्रार केली होती.परंतु जी.प प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक हैराण झाले आहे म्हणून नागरिकांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात जवळपास 8 ते 10 हजार नागरिक सहभागी होणार आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन असेच सुरू राहील असे खासदार गोवाल पाडवी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी माजी आमदार उदयसिंग पाडवी ,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी ,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या आंदोलनात भाजप सोडून सर्वपक्षीय नेते सहभागी होत आहेत . जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हे भाजपचे आहेत त्यामुळे आंदोलन भ्रष्टाचाराविरुद्ध आहे की भाजपच्या विरुद्ध आहे असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *