बाल संस्कार वर्गातील बालकांशी डॉ केतकी पाटील यांनी साधला संवाद.

बाल संस्कार वर्गातील बालकांशी डॉ केतकी ताई पाटील यांनी साधला संवाद

जळगाव – रावेर येथे विद्याभारती देवगिरी प्रांत संलग्नित यशवंत प्रतिष्ठान रावेर संचलित बालसंस्कार वर्गास आज शनिवार दिनांक १३ रोजी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी बाल संस्कार वर्गाची माहिती जाणून घेत उपस्थित बालकांशी संवाद साधला.


रावेर येथील जुना तामसवाडी रोड येथील सेवा वस्तीत बाल संस्कार वर्ग गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. सेवा वस्तीतील वनवासी समुदायातील लोक निवास करतात. येथील बालगोपालांना शिक्षण आणि बाल संस्कार, महिला आरोग्य जागृतीचे कार्य संस्थेकडून करण्यात येते. हे कार्य विद्याभारतीचे विभाग मंत्री निलेश पाटील आणि त्यांच्या पत्नी नयना निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व रेखाताई चौधरी यांच्या सहकार्याने पार पडत आहे.


शनिवारी बालसंस्कार वर्गा वेळी तेथील बालकांना गणवेश आणि पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. यावेळी सेवा वस्तीतील बालकासोबत आणि महिलांसोबत संवाद साधून त्यांना आरोग्या विषयी माहिती दिली. या प्रसंगी नयना निलेश पाटील, विद्याभारतीचे विभाग मंत्री निलेश पाटील, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विभाग संघटन मंत्री धनंजय शेरकर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे भुसावळ जिल्हा संयोजक मोहित देसाई, जिल्हा सहसंयोजक अभिषेक महाजन, शहर अध्यक्ष प्रा. संतोष गव्हाळ, उदय दाणी, हेमंत पाटील, जयंत पाटील, बालसंस्कार वर्ग कार्यवाह सुशिल वाणी, शहरातील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर राजेंद्र पंढरीनाथ चौधरी यांच्या पत्नी रेखा चौधरी, किलबिल विद्यालयातील सहशिक्षिका अश्विनी पाटील, मीनाक्षी कोळी, प्रियंका पाटील, तेजस्विनी महाजन, रोशनी चौधरी, अश्विनी महाजन यांच्यासह सेवा वस्तीतील बालके,महिला आणि नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *