बेकायदा सावकारी जाचाला कंटाळून घेतला गळफास, समाज बांधवांनी काळ्या फिती लावत केला निषेध.

अमळनेर तालुक्यातील बोदडें येथील संतोष हिरामण मिस्तरी यांनी बेकायदा सावकारी जाचाला कंटाळून गळफास घेतला होता. या प्रकरणी आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा तसेच बेकायदा सावकारी आणि गुंडप्रवृत्ती विरोधक कलमे लावून गुन्हा नोंद करण्यात यावा.

या मागणीसाठी सुतार समाजाने मंत्री अनिल पाटील यांच्याकडे धाव घेतली. मंत्री पाटील यांनी म्हणने ऐकून घेत मदतीचे आश्वासन दिले. तर पीडित संतोष यांच्या कुटुंबाला २५ हजारांची आर्थिक मदत देऊ केली. तालुक्यातील बोदर्डे येथील संतोष हिरामण मिस्तरी हे गावातील अशोक चौधरी व मुडी येथील भालेराव महाजन या खासगीसावकारांच्या जाचाला कंटाळले होते. या दोघांनी मिस्तरी यांच्याकडून उपजिवीकेची साधने आणि दुचाकीही हिसकावली होती. त्यामुळे कंटाळून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मारवड पोलिसांनी वस्तुस्थिती लक्षात न घेता किरकोळ कलमे आरोपींच्या विरोधात लावले व गुन्हा दाखल केला. यामुळे आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झाला. असे गऱ्हाणे अनिल पाटलांकडे मांडण्यात आले.दरम्यान समाज बांधवांनीकाळ्या फिती लावत निषेध केला

यामुळे संतप्त झालेल्या सुतार समाज बांधवांनी काळ्या फिती लावून मंत्री अनिल पाटील यांचे निवासस्थान गाठत त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले व चर्चा केली. २१ जुलै रोजी ही घटना घडली होती. सावकारांचे मुद्दल दिले होते पण त्यांनी व्याजासाठी तगादा लावला होता. उपजिवीकेची साधनेही हिसकावल्याने ते हतबल झाले आणि जाचाला कंटाळून मृत्यूला कवटाळल्याचे कथन करण्यात आले

सदर गुन्ह्याचा जलदगती न्यायालयात खटला चालावा व दोषींवर कठोर कारवाई व्हावी तसेच आत्महत्याग्रस्त निराधार व दुर्बल कुटुंबाला शासकीय आर्थिक मदत तात्काळ मिळावी अशी विनंती केली. यावेळी विश्वकर्मा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पांचाळ, यशवंत आहेर, सतीश जाधव, संतोष पगारे, अरुण बोरसे, गुलाब भामरे, उद्देश वाघ, मनीषा वाघ, अनिता मिस्तरी, गायत्री मोरे, मंगल मिस्तरी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *