भामलवाडी शिवारात निसर्गाचा चमत्कार , कडू निंबाच्या झाडामध्ये छ्त्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा
रावेर तालुका प्रतिनिधी ; विनोद कोळी
रावेर तालुक्यातील भामलवाडी शिवारात गावाच्या जवळच शेताच्या बांधावर कडू निंबाचे एक मोठे झाड आहे, आणि त्या झाडाच्या फांद्या अशा प्रकारे वाढल्या आहेत की त्यात छ्त्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा हुबेहूब दिसत आहे. त्यांचा जिरे टोप, त्यांची दाढी, कानातील कुंडल, हे सर्व स्पष्ट दिसत आहे. परंतु ही प्रतिमा संध्याकाळी सहा वाजेच्या पुढेच सूर्य मावळण्याच्या वेळेस दिसते . आणि ह्या प्रतिमेचा साक्षात्कार सर्व प्रथम गावातील दोन तरुणांना झाला, दीपक सुनील पाटील, व लीलाधर अशोक पाटील. हे दोन तरुण संध्याकाळी रस्त्यावर उभे असताना अचानक त्यांचे लक्ष्य कडू निम्बाच्या झाडाकडे गेले. आणि त्यांनी गावात येऊन लोकांना याबाबत माहिती दिली. आणि ही प्रतिमा पाहण्यासाठी दररोज संध्याकाळी गावातील लोक व परिसरातील सर्व गावातील लोक खूप गर्दी करत आहे. ही निसर्गाची किमया आहे की दैवी शक्ती आहे असे सर्व लोक बोलत आहे.