शिवसेना-उबाठा पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश माणिक पाटील यांच्या कारवर जमावाने हल्ला केल्याची घटना आज रात्री घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात जोरदार टक्कर होत असून यात गुलाबराव देवकरांनी विद्यमान लोकप्रतिनिधी गुलाबराव पाटील यांना तगडे आव्हान उभे केले आहे. प्रचाराच्या दरम्यान दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या आहेत. यात देवकरआप्पांच्या बाजूने रमेश माणिक पाटील यांनी अतिशय आक्रमकपणे भाषणे करून प्रचारात रंगत भरली होती. आता त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या संदर्भात रमेश माणिक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ते आज रात्री दहाच्या सुमारास पथराड येथून येतांना चांदसर रेल्वे गेटजवळून आपल्या वाहनातून जात असतांना त्यांच्यावर मोठ्या जमावाने हल्ला केला. त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. यात त्यांच्या एमएच 19 सीझेड 8200 या क्रमांकाच्या कारचा मागील बाजूला असलेला काच फुटला, तर समोरच्या काचाचेही नुकसान झाले. त्यांच्या ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून तेथून वाहन जोरात पुढे नेल्यामुळे अनर्थ टळला अशी माहिती रमेश माणिक पाटील यांनी दिली.तर, यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस-शरचदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी रवींद्र भिलाजी पाटील यांच्या वाहनावर देखील धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, रमेश माणिक पाटील यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच शिवसेना-उबाठा पक्षाचे उपनेते तथा जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी धरणगाव पोलीस स्थानक गाठून त्यांची विचारपूस केली. दरम्यान, रमेश पाटील यांच्या कारवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांची विचारपूस केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात धरणगाव पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.
Related Posts
धामोडी येथील रिक्षाचालक सुभाष प्रल्हाद पाटील यांचा रिक्षा पलटी झाल्याने जागीच मृत्यू…..
धामोडी येथील रिक्षाचालक सुभाष प्रल्हाद पाटील यांचा रिक्षा पलटी झाल्याने जागीच मृत्यू….. रावेर ता. प्रतिनिधी :-प्रदीप महाराज रिक्षा पलटी झाल्याने डोक्याला मार लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दि ३ रोजी तालुक्यातील धामोडी फाट्याजवळ घडली. या घटनेत रिक्षाचालक सुभाष प्रल्हाद पाटील वय ४३ याचा जागीच मृत्यू झाला आहे. धामोडी येथील रहिवासी रिक्षाचालक सुभाष प्रल्हाद पाटील […]
श्री चक्रधर स्वामी अवतार दिन निमित्त सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात स्वामीची प्रतिमा भेट.
श्री चक्रधर स्वामी अवतार दिन निमित्त सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात स्वामीची प्रतिमा भेटभडगाव तालुका प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : महानुभाव पंथ प्रवर्तक भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिन प्रत्येक कार्यालयात साजरा करण्यात यावा या बाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक २८ जानेवारी २०२४ च्या परिपत्रकात नमूद करण्यात आले असून दिनाक ०५ सप्टेंबर २०२४ गुरुवारी श्री चक्रधर […]
जळगाव शहरात सकाळी ९ वाजेपर्यंत ‘इतके’ टक्के मतदान.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान झाले आहे. जळगाव विधानसभा मतदारसंघात आमदार राजूमामा भोळे, जयश्री सुनील महाजन, अश्विन सोनवणे या उमेदवारांनी मतदान केले असून अनेक सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, सामान्य नागरिक मतदान केंद्रावर […]