आई-वडिलांचे पाद्यपूजन करून पलोड शाळेतील विद्यार्थ्यांनी साजरी केली आगळी वेगळी गुरुपौर्णिमा.

आई-वडिलांचे पाद्यपूजन करून पलोड शाळेतील विद्यार्थ्यांनी साजरी केली आगळी वेगळी गुरुपौर्णिमा विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल या शाळेमध्ये २०जुलै रोजी आगळ्यावेगळ्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुला अतिशय महत्त्व आहे. गुरु हा आपला मार्गदर्शक असतो यामध्ये आई वडील हे आपले प्रथम गुरु असल्याने नेहमीच ते उच्च स्थानी आहेत आणि म्हणूनच म्हटले जाते “मातृ पितृ देवो भव’ म्हणजेच आई वडील हे ईश्वर तुल्य आहेत. भारतीय संस्कृती आई-वडिलांचा सन्मान करणे त्यांचा आदर करणे आणि आयुष्यभर त्यांच्या आज्ञेत राहणं शिकवत आली आहे परंतु आधुनिकतेच्या काळात नवी पिढी आपली ही संस्कृती विसरत चालली आहे परंतु आधुनिकता कितीही झाली असली तरी आई वडील हे कुटुंबाचा अविभाज्य भाग असतात आणि त्यांच्या शिवाय व्यक्तीचे अस्तित्व असू च शकत नाही. आणि त्यांना वेगळे करून आपण जगणे हा विचारच मुळात चुकीचा आहे हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना शाळेत घेऊन येण्यास सांगितले .या कार्यक्रमासाठी विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई पाटील ,प्रतिष्ठानच्या सदस्या , वैजयंती पाध्ये हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित प्रमुख पाहुणे, शाळेचे प्राचार्य प्रविण सोनावणे, शाळेचे प्रशासकीय अधिकारी मिलिंद पुराणिक, शाळेच्या समन्वयिका सौ स्वाती अहिरराव, अनघा सागडे यांच्या हस्ते सरस्वती आणि महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रत्यक्ष पाद्यपूजन सोहळा सुरू झाल्यानंतर आपल्या पालकांसमोर बसून विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे किंवा आलेल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे पाय धुवून पुसून कुंकू लावून व पायावर फुले वाहून,नमस्कार करून त्यांचे पाद्यपूजन केले.

त्याच वेळेस आलेल्या मान्यवरांपैकी श्रीमती शोभाताई पाटील यांचे पाद्यपूजन शाळेचे प्राचार्य सोनावणे आणि वैजयंती पाध्ये यांचे पाद्य पूजन शाळेचे प्रशासकीय अधिकारी मिलिंद पुराणिक, सौ स्वाती अहिरराव विकास कोळी यांनी केले .या कार्यक्रमास पालक शिक्षक संघाचे सदस्य असलेले पालक देखील उपस्थित होते . तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती यादेखील या कार्यक्रमास उपस्थित होत्या. त्यांनी देखील त्यांचे पाद्यपूजन केले . असा हा पाद्यपूजनाचा सोहळा सुरू असताना काही पालकांच्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रू आले होते. अतिशय भावविभोर करणारा हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा होता. आणि खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी होत आहे हा भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.श्रीमती शोभा पाटील यांनी पालकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधून आयुष्यात गुरूंची भूमिका किती महत्त्वाची आहे हे सांगितले . पालकांच्या वतीने मिनल जैन व .अनुराधा वाणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर विद्यार्थ्यांच्या वतीने सोहम कुलकर्णी व एकता मुंदरा या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गुरुपौर्णिमेचे महत्त्व ऋषिकेश बारी आणि नेहा महाजन या विद्यार्थ्यांनी सांगितले. प्राथमिक विभागाच्या व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी नृत्य व नाटिका सादर केले. पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांना पीपीटी द्वारे गुरुचे महत्त्व व पादय पूजनाचे महत्त्व सांगण्यात आले. संगीता गुरव आणि सौ साक्षी जोशी यांनी भजन सादर केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा वाडीले , हर्ष सोनवणे आणि नेहा पवार या विद्यार्थ्यांनी केले, पाहुण्यांचा परिचय मंजुषा भिडे यांनी करून दिला . पाद्यपूजन सोहळ्याचे प्रास्ताविक. कविता राणे यांनी केले , सोहळ्याचे सूत्रसंचालन अश्विनी बाविस्कर यांनी केले तर भारती अत्तरदे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन सौ. कविता राणे , अरुण पाटील . साक्षी जोशी यांनी केले . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सहसमन्वय विकास कोळी , प्रदीप पाटील ,शिक्षिका सौ भारती माळी , स्मिता राव यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *