संगीताची भाषा ही जगातील सर्वोत्तम सुलभ भाषा : प्रा.बी.एन.चौधरी.

संगीताची भाषा ही जगातील सर्वोत्तम सुलभ भाषा : प्रा.बी.एन.चौधरी. धरणगावात स्व.लक्ष्मीचंदजी डेडिया स्मरणार्थ संगीत महोत्सव संपन्न :

धरणगाव तालुका (प्रतिनिधी) : राजु बाविस्कर ! संगीताची भाषा ही जगातील सर्वोत्तम सुलभ भाषा आहे. ती जात, धर्म, प्रदेशाची सीमा ओलांडते. माणसामाणसात प्रेम निर्माण करते. संगीत मनातील ताणतणाव दूर करुन मनस्वास्थ्य प्रदान करते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक, व्यंगचित्रकार प्रा.बी.एन.चौधरी यांनी केले. प्रत्येक माणसाने आपली उपजीविका सांभाळून एखादी कला जीवनी म्हणून जोपासावी असे आवाहन त्यांनी केले. ते येथील स्व.श्री.लक्ष्मीचंदजी डेडिया (मास्टरजी) यांच्या स्मरणार्थ त्यांचा शिष परिवार आणि श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित स्वरांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलत होते.

स्व. लक्ष्मीचंदजी डेडीया दुसऱ्या स्मृती-संगीत महोत्सवाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.बी.एन.चौधरी सर यांचा सत्कार आ.दि.जैन मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष राहुल जैन यांनी केले. कार्यक्रमात खान्देशातील प्रसिद्ध बासरी वादक योगेश पाटील यांच्या बासरी वादनानंतर आर.बी.पाटील, दुष्यंन्त जोशी, मोहन रावतोळे यांनी शास्त्रीय गायन,भैरवी,एकल गायन केले. सचिन जगताप आणि चि.स्वरा जगताप यांचे सोलो तबला वादन उत्स्फूर्त दाद घेवून गेले. राजेश डहाळे,प्रदीप झुंझारराव, नाना पवार, तनय डहाळे, राजेश मकवाने, दीपक चौधरी, किरण महाजन, चि.पूर्वा पाटील, चि.निशांत पाटील, शोभा सूर्यवंशी, स्वाती भावे, भारती तिवारी, कु.श्रेया भावे, संजय परदेशी, पियुष डहाळे यांनी आपले भजन, भक्तीगीत, सादरीकरण केले. सभागृहाबाहेर रिमझीम पाऊस कोसळत असतांना सभागृहात सूर-संगीताच्या सरीत रसिक श्रोते चिंब भिजत होते. अंत्यत शिस्तबद्ध आणि देखण्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने मने जिंकून घेतली. शहरात या कार्यक्रमाच्या निमित्ताने गीत-संगीत कलावंतांसाठी एक नवे व्यासपीठ उभे रहात आहे.

संगीत क्षेत्रात गुरु परंपरेला खूप महत्व आहे. आपल्या गुरुंप्रती त्यांच्या शिष्यानी दाखवलेल्या आदरातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला डी जी पाटील, डॉ. मिलिंद डहाळे, प्रा. ए आर पाटील, गणेश रावतोळे, जे ए पाटील, भानुदास विसावे,संजय महाजन, राजेंद्र वाघ, लक्ष्मण पाटील,विजय शुक्ला यांसह शहरातील शैक्षणिक, सामाजिक,राजकीय क्षेत्रातील रसिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन अभिजित पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रतीक जैन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष राहुल जैन, श्रेयान्स जैन (सचिव), प्रमोद जगताप, निकेत जैन, प्रफुल जैन, सुजित जैन,नितीन जैन व विलास जैन आणि मंडळाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *