सिद्धेश्वर विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिवस व विश्व आदिवासी दिवस उसात साजरा.

सिद्धेश्वर विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिवस व विश्व आदिवासी दिवस उसात साजरा,

नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित सिद्धेश्वर विद्यालय समशेरपुर येथे 9 ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयातील शिपाई कर्मचारी ए एम भील तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयातील मुख्याध्यापक पियुष पाटील व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रथम भारत माता, विर एकलव्य व क्रांती नायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. प्रसंगी विद्यालयातील इयत्ता 5 वी ते 10वीच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आदिवासी समूहनृत्य , सोलो नृत्य, आदिवासी गीत गायन याद्वारे आदिवासींच्या जीवनसंस्कृतीचे दर्शन घडवून व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक व स्वातंत्र्य सेनानी यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना मानवंदना देण्यात आली. वरील कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक पियुष पाटील, एम सी कासार , ए बी पाटील , आर जी जाधव ,  एस के पाटील पी एन पाटील जि व्ही पाटील, ए सी ढोले ,  एस आर कासार, पी व्हि बोरसे, आर एस जाधव  ए एमभिल, आर के मराठे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *