ग्रामीण रूग्णालय रावेर तर्फे थोरगव्हाण येथील देशमुख विद्यालयात 5 वी ते 12 वी सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी.

शालेय आरोग्य तपासणी

भुसावळ प्रतिनिधी- यवराज कुरकुरेग्रामीण रूग्णालय रावेर तर्फे थोरगव्हाण येथील देशमुख विद्यालयात 5 वी ते 12 वी सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली . राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रम अंतर्गत सदर शिबिर आयोजित करण्यात आले . शिबिर पथकातील प्रमुख डॉ प्रशांत पाटील, ए एन एम रोहिणी ढाके, फार्मोसिस्ट जगदिश महाजन यांचे पथकाने या साठी अनमोल सहकार्य केले . डॉ . प्रशांत पाटील यांनी पोषण आहाराचे महत्व सांगितले तळलेले बाहेरचे उघड्यावरील पदार्थ खावू नये . ज्वारीची भाकरी मोळ आलेले कडधान्य याचा आहारात जास्त सामावेश करावा असे मत व्यक्त केले .विद्यालयाचे मुख्याध्यापक सत्यनारायन वैष्णव यांनी नियोजन केले विद्यालयात आरोग्य तपासणीतून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची समस्या दूर होईल सुदृढ आरोग्यातून अभ्यासा साठी त्यांचे मन लागेल असे सांगितले .याप्रसंगी पर्यवेक्षक डि के पाटील युवराज कुरकुरे जयश्री चौधरी नयना पाटील यांनी सहकार्य केले सर्व विद्यार्थी शिक्षक बंधु भगिनी हजर होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *