डॉक्टर हर्षल माने चषक आंतर शालेय हॉकी स्पर्धा
अँग्लो,गोदावरी, जळगाव अलहिरा व डॉ उल्ल्हास पाटील भुसावळ संघ विजेते.
जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव शहर मनपा व हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर हर्षल माने पुरस्कृत आंतर शालेय हॉकी १४ वर्ष वयोगटातील स्पर्धांना श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे सुरुवात झाली. मनपा स्तरीयमुलांमध्ये अंगलो उर्दू हायस्कूल जळगाव विजयी, गोदावरी इंग्लिश मीडियम जळगाव उपविजयी तर तृतीय स्थानी विद्या इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव.मुलींमध्ये विजयी गोदावरी इंग्लिश मीडियम जळगाव, उपविजयी पोद्दार इंटरनॅशनल जळगाव तर तृतीय स्थानी विद्या इंग्लिश मीडियम जळगाव.जिल्हास्तरीय मुलांमध्ये विजयी अलहीरा स्कूल भुसावळ ,उपविजयी बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ, तर तृतीय स्थानी डॉक्टर उल्हास पाटील स्कूल भुसावळ,मुलींमध्येविजयी डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम भुसावळ, उपविजयी सेंट मेरी इंग्लिश मीडियम अंमळनेर, तर तृतीय स्थानी बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ.स्पर्धेतील सर्वातकृष्ट खेळाडूमुलांमध्ये तरबेज मुजावर (अँग्लो उर्दू जळगाव) हसनैन मुस्तकीम (अलिहरा भुसावळ)मुलींमध्ये तनिष्का पाटील (गोदावरी इंग्लिश जळगाव) व आकांक्षा तायडे (डॉक्टर उल्हास पाटील स्कूल भुसावळ)यांच्या हस्ते झाले पारितोषिक वितरण
हॉकी जळगावचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर हर्षल माने, राष्ट्रवादी शरद पवार महिला महानगराध्यक्ष मंगलाताई पाटील, राष्ट्रवादी शरद चंद्र पवार जिला अध्यक्ष अल्पसंख्यक मजहर पठाण, व्यापार व उद्योग जिला अध्यक्ष कांग्रेस आय सलीम ईमानदार, हॉकी महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ प्रा अनीता कोल्हे, जलगांव हॉकी सचिव फारुक शेख,सह सचिव हिमाली बोरोले, एडवोकेट आमीर शेख यांच्या हस्ते विजेते, उपविजेते वह तृतीय संघ यांना डॉक्टर हर्षल माने ट्रॉफी सह स्वर्ण, रजत व कास्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले.फोटो१) मनपा व उर्वरित मुलं आणि मुलींचे चारी विजय संघासोबत खुर्चीवर बसलेले प्रमुख अतिथी गण व क्रीडाशिक्षक दिसत आहे