धनंजय चौधरी यांचा आज बोरखेडा रावेर, वाघोड, मोरगाव खुर्द, मोरगाव बुद्रुक येथे कृतज्ञता संवाद दौरा संपन्न?

धनंजय चौधरी यांचा आज बोरखेडा रावेर,वाघोड,मोरगाव खुर्द,मोरगाव बुद्रुक येथे कृतज्ञता संवाद दौरा संपन्न?

दक्ष जळगाव प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेर ! या दौऱ्या दरम्यान सर्वप्रथम धनंजय चौधरी यांनी बोरखेडा येथे श्री महादेवाचे दर्शन घेऊ गावातील ग्रामस्थ व महिलांना संबोधित करताना मुलांच्या शिक्षणाची त्यांच्या अडचणीची व महिलांचे घरामध्ये असलेले महत्त्व नमूद केले. महिलांनी व गावातील ग्रामस्थानी त्यात भाग घेतला नदीकाठ असल्याने मुलांच्या बसेसची सुविधा निर्माण करून देण्यासाठी धनंजय चौधरी यांनी निवेदन घेऊन तात्काळ बस डेपो मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला व निवेदन दिले.पूर्वजांच्या स्मृतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. वाघोड येथे तरुणांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून धनंजय चौधरी यांचे स्वागत केले त्याचप्रमाणे धनंजय चौधरी यांनी महात्मा फुलेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

त्याचप्रमाणे प्रतिष्ठित हनुमान मंदिर व कुवर स्वामी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.गावातील तरुणांनी धनंजय चौधरी सोबत गावात फेरी मारली असताना गावकऱ्यांच्या सुखदुःखाची व त्यांच्या अडचणीची माहिती घेतली युवकांना व्यायाम शाळा व त्यात लागणारे साहित्य याची माहिती घेतली बहुसंख्य तरुणांनी धनंजय चौधरी शी जवळीक साधली त्याचप्रमाणे ग्रामस्थ लोकांनी सुद्धा धनंजय चौधरी चे स्वागत करून आशीर्वाद दिले नंतर मोरगाव खुर्द व मोरगाव बुद्रुक येथे माननीय आमदार शिरिष चौधरी यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेल्या पेवरब्लॉक, रस्ते, गटारी, यांच्या कामामुळे धनंजय प्रती गावकऱ्यांकडून कृतज्ञतापूर्वक उद्गार धनंजय चौधरी समोर काढण्यात आले. याप्रसंगी खालील गावातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती  बोरखेडे येथे प्रमोद पाटील, बाळू पाटील, प्रकाश रायम रायमले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


वाघोड येथे गुणवंत सातव,दिनकर महाजन,जगदीश महाजन,प्रमोद पाटील,प्रकाश रायमोळे,निवृत्ती पाटील संजय मशाने, ग्रामपंचायत चे मेंबर गुणवंत सातव ह्यांच्या हस्ते करण्यात आले.त्या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती जगदीश महाजन,उपसरपंच अनिल सातव पाटील जगदीश महाजन राहुल पाटील राहुल पाटील जगदीश महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण व जलपूजन करण्यात आले त्याप्रसंगी गावातील युवा मंडळी राहुल पातील,नरेंद्र महाजन,गणेश बोरणारे,सागर पाटील,कपिल पोलीस पाटील.यांची उपस्थिती लाभली. मोरगाव बु. येथे सरपंच स्वप्निल पाटील, महेंद्र पाटील, अतुल पाटील,विक्रम पाटील, समाधान पाटील, रवींद्र पाटील, शिवदास पाटील, सिद्धार सोमा कोळी, श्रीधर कोळी, गोकुळ पाटील, गोपाळ पाटील, सोनू राजपूत, कमलेश राजपूत, रामदास पाटील यांच्या हस्ते वृषारोपन व जलपूजन करण्यात आले. मोरगाव खुर्द सरपंच जगन्नाथ पाटील,पांडुरंग सोनजी पाटील, राजेंद्र पाटील यांच्या हस्ते वृषारोपन व जलपूजन करण्यात आले त्या प्रसंगी गावातील वरिष्ठ मंडळी रवींद्र पाटील, एकनाथ पाटील, गौरव कोळी, सचिन पाटील , कैलास पाटील, धनंजय तायडे, रवींद्र पाटील, बिरलाल पाटील हे उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *