सुरेखा पिलोरे यांची शिंदी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी बिनविरोध निवड…!

सुरेखा पिलोरे यांची शिंदी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी बिनविरोध निवड…!

शिंदी ता. चाळीसगांव :- येथे दि.२५ जुन २०२४ मंगळवार रोजी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ.सुरेखा ज्ञानेश्र्वर पीलोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक प्रक्रियेचे काम निवडणूक अधिकारी / मंडल अधिकारी शरद पाटील , तलाठी नन्नवरे साहेब , ग्रामसेवक चेतन पाटील यांनी पाहिले.

शिंदी ग्रामपंचायतीचे सरपंच सरुबाई जाधव यांनी आपसात ठरल्यापरमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी सौ.सुरेखा ज्ञानेश्वर पिलोरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणुक अधिकारी शरद पाटील यांनी सुरेखा पिलोरे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

यावेळी शिंदी ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गोरख राठोड, बाळासाहेब राऊत, नामदेव तिकांडे, राम राठोड, राहुल ठाकरे, दिलीप कोकणे,आप्पासाहेब जाधव, पंकज गरुड , कैलास राठोड, भास्कर सोनवणे सदस्य उपस्थित होते.

पिलोरे या कासोदा येथील पत्रकार सागर शेलार भ्रष्टाचार निवारण समिती जिल्हा उपाध्यक्ष यांच्या मोठया बघिनी आहेत.
तसेच मा.लोकनियुक्त सरपंच तथा एरंडोल तालुका अध्यक्ष छावा संघटना उमेश पाटील, राजु तिकांडे, प्रवीण फटांगरे, प्रकाश ठूबे,योगेश सोनवणे, अनिल देशमुख, काशिनाथ सोनवणे, भाऊसाहेब नवले, रामभाऊ राठोड, नारायण तिकांडे, भगवान तिकांडे,पोपट पिलोरे, पिंटू शेलार,सचिन ठुबे नंदू निकम , अनिल राठोड , योगेश देशमुख , अशोक राठोड , प्रकाश पिलोरे, बाबुलाल पिलोरे, गुलाब पिलोरे, अनिल नवले, किरण फटांगरे, समाधान पिलोरे, रमन पिलोरे, आप्पा पिलोरे, दिपक पिलोरे, राजु काळे , संजु पिलोरे, प्रवीण नवले आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी समर्थकांनी पेढे भरवून, गुलालाची उधडन करत फटाक्यांची आतिषबाजी करुण जल्लोष साजरा केला. व सर्वांनी नवनिर्वाचित सरपंचांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच सुरेखा पिलोरे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *