केंद्रीय मंत्री ना.रक्षा खडसे यांचा समशेरपूर गावात नागरी सत्कार.

केंद्रीय मंत्री ना.रक्षा खडसे यांचा समशेरपूर गावात नागरी सत्कार.नंदुरबार प्रतिनिधी सुरेश बोरसेनंदुरबार – केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री नामदार रक्षा खडसे यांचा नंदुरबार तालुक्यातील समशेरपुर या गावात नागरी सत्कार करण्यात आला रक्षा  खडसे यांचे शहादा तालुक्यातील माहेर असून समशेरपूर हे त्याचे मामाचे गाव आहे. जिल्ह्यातील कन्याचे केंद्रात मंत्री पदा वर वर्णी लागल्याने ना.रक्षाताई खडसे यांचा सत्कार व सन्मान गावकर्यांच्या वतीने करण्यात आला.गावातील गुरुदत्त मंदिरात हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समशेरपूर गावातीलसरदार वल्लभ भाई पटेल ग्रुप,वाल्मीक सेना ,विश्वकर्मा सुतार समाज ,डॉ. बी. आर. आंबेडकर सोशल ग्रुप यांच्याकडून स्वागत करण्यात आले.यावेळी ना. रक्षा खडसे यांचे मामा दगडू हरी चौधरी ,प्रकाश दगडू चौधरीमाजी सरपंच मंदाताई चौधरी तसेच गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *