रावेर तहसीलदार यांना सेवा केंद्र चालक व CSC केंद्र चालकांचे निवेदन.

रावेर तहसीलदार यांना सेवा केंद्र चालक व CSC केंद्र चालकांचे निवेदन.

रावेर तालुक्यातील सर्व CSC केंद्र चालक व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी रावेर तहसीलदार यांना एक निवेदन दिले .त्यात त्यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्री साहेब आपण राज्यातील गोरगरीब जनतेसाठी विविध योजना राबवता ,आणि या सर्व योजना आम्ही नागरिकांच्या दारापर्यंत पोहचविण्याचे काम करतो. विविध सेवा योजना प्रमाण पत्र,बी टू सी .सेवा जी टू सी.सेवा ,श्रम कार्ड,शासकीय दाखले, के वाय सी. आयुष्यमान कार्ड, मतदान कार्ड, पीक विमा योजना, आधार सेवा, आयकर सेवा, अशा अनेक प्रकारच्या सेवा आम्ही नागरिकांपर्यंत पोहचवत आहे.मात्र शासनाकडून या योजनांच्या मोबदल्यात काही मिळाले नाही.तसेच माझी लाडकी बहिण योजना आपण आणली,तरी सदर योजनेचे आम्हाला प्रति अर्ज 100,रू. देण्याचे करावे. आणि हे मानधन कशा माध्यमातून देण्यात येणार याचेही उत्तर द्यावे.


तरी आम्हाला अपेक्षा आहे की आपण आम्हा आपले सरकार सेवा केंद्र व सीएससी केंद्र चालक यांचा विचार कराल .अन्यथा आम्हा सर्वांना लोकशाही मार्गाने उपोषणाला बसावे लागेल.तरी सदर अर्जाची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांना सुधा पाठवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *