आजचे राशिभविष्य बुधवार, १० जुलै २०२४

मेष : ग्रहमान अनुकूल आहे. विविध कामांमध्ये व्यस्त राहाल. करिअर संबंधिी समस्येवर उपाय शोधल्याने विद्यार्थ्यांमधील उत्साह वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्‍हाल.मनाप्रमाणे कोणतेही इच्छित कार्य करण्यात यश न मिळाल्याने मन निराश राहील. धीर सोडू नका आणि प्रयत्न करत राहा

वृषभ : आज काही खास लोकांशी भेट होईल. योग्‍य संवादातून तुमचे कार्य पूर्ण कराल. अयोग्‍य कामांकडे दुर्लक्ष करत आपल्या कार्यात समर्पित व्हा. थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू शकतो. अनावश्यक खर्चामुळे गुंतागुंत होऊ शकते, .कायदेशीर वादातही अडकू शकता. वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नका, अशी सूचना श्रीगणेश करतात. व्यवसायाशी संबंधित कामांसाठी वेळ अनुकूल आहे.

मिथुन : ग्रहस्थिती तुम्हाला अद्भुत शक्ती प्रदान करेल. संपर्क क्षेत्रात वाढ होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक कामात यश मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात थोडा वेळ व्‍यतित केल्‍याने तुम्हाला मानसिक शांती लाभेल. मालमत्ता किंवा वाहना संदर्भात समस्या असू शकते. निष्‍कारण चर्चेत वेळ वाया घालवू नका. व्यवसायात नवीन तंत्रज्ञान आत्‍मसात करण्‍याचा प्रयत्‍न करा.

कर्क : तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही सकारात्मक बदल अनुभवाल. विशिष्ट कार्यासाठी प्रयत्नशील राहा. घाई गडबड टाळा. अनुभवी व्यक्तीशी चर्चा करत राहा. खर्च अधिक होईल;पण उत्‍पनाच्‍या साधनातही वाढ होईल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ नाही.

सिंह : आज कौटुंबिक सुखसोयींशी संबंधित वस्तूंची खरेदी कराल. करिअरशी संबंधित समस्येवर उपाय मिळाल्याने विद्यार्थ्यांना तणावमुक्त वाटेल. मोठा निर्णय घेण्‍यासाठीचा आत्‍मविश्‍वास तुमच्यात असेल. विश्वासू व्यक्तीचा योग्य सल्ला मिळेल. आवश्यक खर्चातही कपात करावी लागेल. छोट्या-छोट्या गोष्टींवर नाराज होणे टाळा.

कन्या : शिक्षणाशी संबंधित कोणताही अडथळा दूर झाल्याने विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. अचानक कोणाशी भेट झाल्याने मन प्रसन्न राहील. मालमत्तेसंबंधी कोणताही वाद शांततेने सोडवला जाईल. कोणाबद्दलही घाईघाईने निर्णय घेऊ नका. चुकीच्या कामात वेळ वाया गेल्याने मन निराश होईल. व्यवसायात काही लाभदायक पदे मिळतील.

तूळ : आज तुमच्‍या लोकप्रियतेबरोबरच जनसंपर्काची व्याप्ती वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. या क्षणी फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. एखाद्या संस्थेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. नियमित दिनचर्या राखणे आवश्यक आहे. कोणतीही योजना बनवण्यापूर्वी त्यांचा गांभीर्याने विचार करा. अन्यथा काही चुका होऊ शकतात. आर्थिक व्यवहारात कोणावरही विश्वास ठेवण्याआधी योग्य ती काळजी घ्या

वृश्चिक: प्रतिष्ठित लोकांच्या भेटीचा लाभ होईल. मौल्यवान वस्तूंची खरेदीचा योग आहे. . नकारात्मक कृती करणाऱ्या लोकांपासून दूर राहा, घरातील मोठ्यांच्या सल्ल्याकडे आणि मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करू नका. व्यावसायिक कार्ये अधिक चांगली ठेवण्यासाठी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.

धनु : ग्रहस्थिती अनुकूल आहे. आत्मविश्वास आणि धैर्य टिकवून ठेवा. तुमच्या दृढनिश्चयाने सर्वात कठीण कामे पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असेल. मात्र इतरांच्या बोलण्यात अडकून तुम्ही स्वतःचे नुकसान करू शकता. महिन्याच्या सुरुवातीला प्रत्येक हालचालीबाबत सावध राहणे आवश्यक आहे. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. व्यवसायात योग्य सुव्यवस्था राखण्यात सक्षम व्हाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मकर : काही काळ तुमच्या विरोधात असलेले लोक आता तुमच्या बाजूने येतील. दिलेल्‍या आश्‍वासनाची पूर्तता करा. काहीवेळा स्वत: चा विचार करणे आणि फक्त स्वतःबद्दल विचार करणे जवळच्या नातेवाईकांसोबत कटुता निर्माण करू शकते. तुमच्या कामाचा दर्जा चांगला ठेवा

कुंभ: सकारात्मक विचारातून अडचणींवर मार्ग शोधाल. कुटुंबात काही काळापासून सुरू असलेले गैरसमज तुमच्या मध्यस्थीने दूर होतील. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही विषयावर भावांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. कोणतीही नवीन गुंतवणूक टाळा
मीन : धार्मिक स्थळी गेल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. समाजिक कार्यात तुमचे विशेष योगदान असेल. कोणत्‍याही बेकायदेशीर कामात सहभागी होवू नका. अनावश्यक वाढलेले खर्च त्रासदायक ठरेल. अतिउत्साहामुळे कामे बिघडू शकतात. व्यवसाय सुधारण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *