डी .एस . देशमुख विद्यालयात वर्ग प्रतिनिधी निवडणूक ठरली लोकशाही मूल्य रुजवणारी

डी .एस . देशमुख विद्यालयात वर्ग प्रतिनिधी निवडणूक ठरली लोकशाही मूल्य रुजवणारी

भुसावळ प्रतिनिधी- युवराज कुरकुरे

दी एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण तालुका रावेर ( स्थापना 1917 ) यांनी चालविलेले डी . एस देशमुख माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय थोरगव्हाण येथे इयत्ता 8 वी ब वर्ग प्रतिनिधी (मॉनिटर) निवड प्रक्रिया लोकशाही गुप्त मतदान पद्धतीने करण्यात आली. वर्ग शिक्षक वाय जे कुरकुरे यांनी आपण वर्ग प्रतिनिधी निवड मतदान घेऊनअनोख्या पद्धतीने करण्याचा प्रस्ताव विद्यार्थ्यान जवळ ठेवला . प्रथम 8 दिवस आधी निवडणूक जाहिर करण्यात आली होती . वर्गातील 35 विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रकियेत सहभाग नोंदवला . एकूण 09 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा, नेतृत्वाने उपक्रम घेण्यात आला. निवडणूक अधिकारी म्हणून पर्यवेक्षक डी के पाटील यांच्या अध्यक्षस्थानी वर्ग प्रतीनिधी निवड प्रक्रिया निःपक्ष आणि शांततेत पहिल्या तासिकेला पर पडली. चेतन मोहन वानखेडे यास प्रथम क्रमांकाची 13 मते मिळाली. वर्ग प्रतिनिधी म्हणून त्याची निवड करण्यात आली. कु प्रीती अरविंद पाटील हिस द्वितीय क्रमांकाची सहा मते मिळाली. तिची उप वर्गप्रतीनिधी म्हणून निवडण्यात आले. कु जागृती अशोक कोल्हे , गुणवंत तुषार कोल्हे यांना तृतीय क्रमांकाची सारखी मते मिळाली.त्यांना वर्ग स्वच्छता मंत्री म्हणून निवड करण्यात आली. निकालाची घोषणा डी के पाटील यांनी केली. त्यावेळी विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता.


या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना श्री डी के पाटील यांनी लोकशाही चे महत्व आणि गुप्त मतदान पद्धत याविषयी आपले विचार मांडले. आणि या उपक्रमाचे कौतुक केले. वर्गशिक्षक युवराज कुरकुरे यांनी सादर उपक्रमासाठी पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *