मुक्ताईनगर तालुक्यातील स्वस्त धान्य त्वरित वाटप करणे बाबत तहसीलदार यांना निवेदन.

 मुक्ताईनगर: मुक्ताईनगर तालुक्यातील स्वस्त धान्य त्वरित वाटप करणे बाबत माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन:- मनसे


मुक्ताईनगर: मुक्ता नगर तहसीलदार श्री गिरीश वखारे साहेबांना महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व दुकानदारांनी जुलै अखेरचे धान्य त्वरित वाटपासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज निवेदन मुक्ताईनगर येथे देण्यात आले आहे यामध्ये स्वस्त धान्य दुकानदार यांचे पास मशीन मध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे दुकानदारांनी जुलै व ऑगस्टचे अजून धान्य वाटप केले नाही तांत्रिक बिघाड आहे मशीन बंद आहे असे कारणे स्वस्त धान्य दुकानदार नागरिकांना देत आहे त्यावर त्यांच्या संघटनेचा जिल्ह्यावर निवेदन देऊन pos मशीन बिघाड आहे तांत्रिक अडचण दाखवून लाभार्थ्यांना एक एक दोन दोन महिने धान्य वितरित होत नाही मशीन बंद तर महिन्याचे लागणारे धान्य खाणे बंद होईल का? असा प्रश्न मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई यांनी श्री.वखारे साहेबांशी केला.दुकान दरांचे बोलणे तहसीलदारांना तक्रार करा अर्ज द्या अशा पद्धतीनं दुकान दार वरचड भाषा करतात आहेत. त्यावर तहसीलदार यांनी उद्या दिनांक ३ ऑगस्ट पासून ऑफ लाईन अथवा ऑनलाईन धान्य वितरण प्रणाली चालू करायला मनसे निवेदना नंतर अश्वासित केले. त्याप्रसंगी मनसे मुक्ताईनगर अध्यक्ष मधुकर भोई,शहर अध्यक्ष मंगेश कोळी,गट अध्यक्ष सुनील कोळी,संपर्क अध्यक्ष विजय भो लाने ,विनोद एकनाथ पाटील,गजानन पाटील,ग्रामस्थ काशिनाथ ठाकरे,विजू कोळी,उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *