आजचे राशिभविष्य सोमवार, १२ ऑगस्‍ट २०२४

मेष : आज व्यावहारिक दृष्टीकोन ठेवल्यास तुमची कार्ये योग्य प्रकारे पूर्ण करण्यात मदत होईल. वैयक्तिक हितसंबंधित कामाने मार्गी लागल्‍याने दिलासा मिळेल. जवळच्या नातेवाईकालाही शुभ कार्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते. कौटुंबिक मतभेदामुळे निराशाजनक वाटेल. कोणतेही आर्थिक व्‍यवहार करुन नका; अन्‍यथा काही नुकसानीची शक्‍यता आहे.

वृषभ : आज तुम्ही घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय फायदेशीर ठरू शकतो. गुंतवणुकीशी संबंधित कामे करण्यासाठीही दिवस उत्तम आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. जोखमीच्या कामांपासून दूर राहा. बेकायदेशीर कामात रस घेऊ नका. कौटुंबिक व्यस्ततेमुळे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात जास्त लक्ष देऊ शकणार नाही. घरातील वातावरण आनंदी राहील. ताप आणि थकवा जाणवेल.

मिथुन : आज भावनिक होऊन चुकीचे निर्णय घेऊ शकता. त्‍यामुळे व्‍यावहारिक दृष्‍टीकोन ठेवणे फायदेशीर ठरेल. सामाजिक कार्यक्रमात महत्त्वाच्या व्यक्तीची भेट होईल. महत्त्वाचा निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. विरोधक ईर्षेपोटी तुमच्या विरुद्ध अफवा पसरवू शकतात. आव्‍हानात्‍मक परिस्थितीचे शांततेने हाताळा. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात शांतता नांदेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करु नका.

कर्क : आज धार्मिक स्थळाला दिलेल्‍या भेटीमुळे मनशांती लाभेल. सामाजिक संस्थेला दिलेल्‍या योगदानाबद्दल तुमचा सन्मान होऊ शकतो. तरुणांनाही काही काळापासून सुरू असलेल्या त्रासातून दिलासा मिळेल. अनावश्यक खर्च वाढल्याने मन थोडे अस्वस्थ होऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. शेजाऱ्याशी वाद होऊ शकतात. संतापाच्या ऐवजी शांततेने परिस्‍थिती हाताळा. तुमच्या समस्या सोडवण्यात जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्य महत्त्वाचे योगदान देतील.

सिंह : आजचा दिवस कुटुंबातील सदस्यांचे कल्याण आणि काळजी घेण्यात व्‍यतीत कराल. मालमत्ता खरेदी निर्णयासाठी आजचा दिवस चांगला आहे. मुलांकडून खूप अपेक्षा ठेवणं त्यांना अधिक हट्टी बनवू शकतं. त्यामुळे स्वभावात लवचिकता ठेवा. विद्यार्थी आणि तरुणांनी ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. जास्त कामाचा ताणामुळे मानसिक थकवा जाणवेल.

कन्या : आज स्‍वकीयांशी असलेले वाद मिटतील. नात्यात पुन्हा गोडवा येईल. मुलांना त्‍यांच्‍या समस्‍यांमध्‍ये मदत केल्‍याने त्‍यांचा आत्‍मविश्‍वास वाढेल. एकूणच आजचा दिवस शुभ राहील. अचानक मोठ्या खर्चामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. या टप्प्यावर खर्चावर नियंत्र ठेवा. व्यवसायाशी संबंधित प्रत्येक कृतीचा गांभीर्याने विचार करा. कौटुंबिक वातावरण आनंदी राखणे खूप महत्वाचे आहे. हवामान बदलाचा आरोग्‍यावर परिणाम होण्‍याची शक्‍यता.

 

तूळ : आज ज्‍येष्‍ठांचे मार्गदर्शनाचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम होईल मात्र अतिरागामुळे एखादे काम बिघडण्‍याची शक्‍यता आहे. संयमाने परिस्‍थिती हाताळा. तुमच्‍या समस्‍यांसंदर्भात कुटुंबातील ज्‍येष्‍ठांचाच सल्‍ला महत्त्‍वपूर्ण ठरेल. आज व्यवसायात जास्त त्रास होऊ शकतो. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. वाहन चालवताना अधिक काळजी घ्‍या.

 

वृश्चिक : आज तुमच्‍या उदार स्‍वभावाचा लोक गैरफायदा घेणार नाहीत याची काळजी घ्‍या. चर्चेपेक्षा कोणतेही काम प्रत्यक्ष व्यवहारात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तणाव घेणे हा या समस्येवर उपाय नाही. योग्य वेळेची वाट पाहा. कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित काम यशस्वी होऊ शकते. घरगुती समस्यांमुळे पती-पत्नीमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. शारीरिक दुखापतीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

धनु : आज एखाद्या राजकीय किंवा सामाजिक कार्यात सहभागी होण्‍याची संधी मिळेल. या माध्‍यमातून तुम्‍हाला महत्त्वपूर्ण यश मिळू शकते. तरुणांनी बेकायदेशीर गोष्‍टी टाळाव्‍यात. अन्‍यथा तुमचे व्यक्तिमत्व कलंकित होऊ शकते. वाहन चालवताना वाहतुकीचे नियमांचे पालन करा. व्यवसायात थोडी मंदी जाणवेल. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. तुमची दिनचर्या आणि आहार योग्‍य ठेवा.

मकर : तुम्ही तुमच्या कुशल व्यवहारातून घर आणि व्यवसाय दोन्हीमध्ये योग्य समन्वय राखाल. मात्र राग आणि हट्टी स्वभाव यांसारख्या दोषांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अन्‍यथा तुमच्या कामात व्यत्यय येऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांचे तुम्‍हाला संपूर्ण सहकार्य लाभेल. तुमच्या सध्याच्या व्यवसायाकडे लक्ष द्या. कामाच्‍या व्‍यस्‍ततेतही घर आणि कुटुंबासाठी वेळ काढाल. आरोग्‍याकडे दुर्लक्ष करु नका.

कुंभ : आर्थिक योजनेवर काम करण्यासाठी अतिशय योग्‍य वेळ आहे. ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनुकूलता निर्माण करत आहे. घरातील कोणत्याही चांगल्या कामाची योजना यशस्वी होईल. मौजमजेत वेळ घालवण्याऐवजी आपल्या कृतींकडे गांभीर्याने लक्ष द्या. अन्यथा तुमची अनेक महत्त्वाची कामे प्रलंबित राहतील. मुलांच्या समस्यांबद्दल तुम्हाला काही चिंता असू शकते. . घरातील व्यवहारात जास्त ढवळाढवळ करू नका. आरोग्‍य उत्तम राहिल.

मीन : आज अचानक एखाद्या खास व्यक्तीशी भेट होऊ शकते. यातून महत्त्वाचे काम मार्गी लागेल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. फसवणूक होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूक करताना अधिक काळजी घेणे आवश्यक राहिल. कौटुंबिक सदस्याच्या आरोग्याबाबतही चिंता जाणवेल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. चुकीच्या आहारामुळे काही शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *