विधानसभा लागण्याच्या अगोदर आमदार आशुतोष काळे यांनी एकलव्याचे स्मारक उभरावे – मंगेश औताडे.

विधानसभा लागण्याच्या अगोदर आमदार आशुतोष काळे यांनी एकलव्याचे स्मारक उभरावे – मंगेश औताडे

कोपरगाव तालुक्यामध्ये आदिवासी समाज हा 50 हजाराहून जास्त लोकसंख्येने असून अद्याप आदिवासी समाजाचे कुलदैवत एकलव्य यांचे स्मारक, तसेच सांस्कृतिक भवन आदिवासींना सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठी नसल्याने आदिवासी समाजामध्ये लोकप्रतिनिधी विषयक तीव्र नाराजी निर्माण झाली आहे कारण मागील पंचवार्षिक रोजी लोकप्रतिनिधी आमदार अशितोष काळे यांनी आदिवासी समाजाचे नेते मंगेश औताडे तसेच हजारो आदिवासी समाज बांधवांना आव्हान केले होते की मी लोकप्रतिनिधी झाल्यास तुम्हाला तात्काळ एकलव्य स्मारक कोपरगाव शहरात उभारून देईल, परंतु हे स्मारक न केल्यामुळे समाजामधे तीव्र नाराजी दिसून येत आहे तसेच अक्षरशा एन दुसरी विधानसभा लागताच आशुतोष काळे यांनी आदिवासी समाजाचे कुलदैवत एकलव्य यांचे स्मारक कोपरगाव तालुक्यात बांधून देऊ असे वक्तव्य केल्याने समाजामधून प्रतिक्रिया उमटत आहे की आमदार आशुतोष काळे यांना जर स्मारक बांधून द्यायचे असेल तर ते विधानसभेच्या आधी बांधून द्यावे अन्यथा येत्या विधानसभेत तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांना वेगळा पवित्रा उचलावा लागेल असे देखील मंगेश औताडे म्हणाले! अन्यथा असे न झाल्यास आदिवासी समाज बांधवांन मध्ये गावोगावी पोहोचून जनजागृती करू व याचा परिणाम विधानसभेत 100% पाहायला मिळेल असे देखील मंगेश औताडे म्हणाले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *