महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवेदनाला यश माननीय राज्यपाल महोदय यांनी काढले नारपारसाठीचे अध्यादेश.

राज्य सरकारने गेल्या अधिवेशनामध्ये अति महत्त्वाचा नारपार नदीजोड प्रकल्पाला मंजुरी देऊन साडेसात हजार कोटी रुपयांची तरतुदी या प्रकल्पासाठी करण्यात आली होती परंतु महाराष्ट्र द्वेषाने पछाडलेल्या गुजरात मधील केंद्रीय जलमंत्र्याने सदर प्रकल्प हा व्यवहारिक नसल्याचे सांगून रद्द केला होता परंतु या अन्याय कारक निर्णयाच्या विरोधामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट निर्माण झाली अनेक सामाजिक संघटना यांनी याचा तीव्र पद्धतीने विरोध करण्यास सुरुवात केली दिनांक सात रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या अन्यायाच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे निषेध नोंदवून दिनांक 12 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रास्ता रोको घेऊन भविष्यात आंदोलने तीव्र स्वरूपाची होतील असा इशारा मनसेने दिला व तीनही मंत्र्यांनी सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे द्यावे अशी मागणी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली होती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संघटनांचा व जनतेचा विरोध बघता सरकारला आपला निर्णय बदलण्याची वेळ आली व नारपार नदीजोड प्रकल्पाला पुन्हा मंजुरी देण्यात आली त्यामुळे दिनांक 12 रोजी घेण्यात येणारे प्रत्येक तालुकास्तरावरचे आंदोलन मागे घेत आहोत याबद्दल सर्व खानदेश वाशी यांचे मनापासून अभिनंदन शेवटी अन्यायाची जाणीव ही सर्वसामान्य जनतेलाच होते हे मात्र निश्चित या जिल्ह्याची शोकांतिका आहे की ज्यांना या जिल्ह्यातील जनतेने मोठे केले मोठ्या पदावर बसवले मंत्री बनवले तेच लोक मात्र ज्यावेळेस या जनतेच्या हक्काचे हिसकावले जाते त्यावेळी मात्र गप्प बसतात व आपलं सोयीचं राजकारण करतात हे या जिल्ह्यातील व उत्तर महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केल्यासारखे आहे . आज शासनाने नारपार नदी जोड प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल त्यांचे निश्चित अभिनंदन व आभार परंतु मंजूर देण्यामागे कुठलेही गलिच्छ राजकारण असू नये अशी एक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होते कारण ज्या प्रकल्पाला व्यवहारिक नसल्याचे सांगून रद्द केले गेले त्याच प्रकल्पाला इतक्या तात्काळ मंजुरी देण्यामागे कुठले स्वार्थी राजकारण तर नाही ना केवळ विधानसभेसाठी प्रकल्पाला मंजुरी द्यायची विधानसभा झाल्यानंतर ज्या पद्धतीने जिल्ह्यातील सात बलून बंधाऱ्यांचा विषय आजही रेंगाळत ठेवला त्याच पद्धतीने नारपार नदीजोड प्रकल्पाचा विषय हा वर्षानुवर्ष रेंगाळत राहू द्यायचा अशी भूमिका सरकारची नसावी अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होते अन्यथा पुन्हा या सरकारच्या विरोधामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जनतेने आपल्या हक्कासाठी लढण्याची तयारी ठेवली पाहिजे इतकचं .. माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *