थोरगव्हाण येथील देशमुख विद्यालयात क्रांती दीन क्रांती करकांच्या प्रतिमांचे पूजन करून संपन्न.

थोरगव्हाण येथील देशमुख विद्यालयात क्रांती दीन क्रांती करकांच्या प्रतिमांचे पूजन करून संपन्न

भुसावळ प्रतिनिधी युवराज कुरकुरे. डी एस देशमुख माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय थोर गव्हाण ता रावेर येथे 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला . क्रांती करकांच्य प्रतिमांचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी क्रांतिकारक सुभाषचंद्र बोस भगत सिंग आणि आदिवासी क्रांती कारक बिरसा मुंडा यांचे प्रतिमांचे पूजन संस्थेचे संचालक रवींद्र चौधरी , मुख्याध्यापक एस एस वैष्णव , पर्यवेक्षक डी के पाटील आणि इतर शिक्षकांनी प्रतिमा पूजन केले. या दिनाचे औचीत साधून वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रवींद्र चौधरी यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून उखर्डू विठोबा चौधरी सेवानिवृत्त आर टि ओ कार्यालय मध्यप्रदेश हे होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाय जे कुरकुरे यांनी केले.


यावेळी सुमारे 56 विद्यार्थ्यांची भाषणे संपन्न झाली. आणि 38 विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषा साकारून देशभक्तीपर वातावरणाची निर्मिती केली.
प्रथम गटातून प्रथम विशाखा मेढे, द्वितीय समर वाघ , तृतीय भवेश कोळी यांची भाषण उत्कृष्ट ठरली. द्वितीय गटातून प्रथम खुशी धनगर, द्वितीय ममता पाटील आणि तृतीय पूर्वाजा पाटील यांची निवड झाली. तृतीय गटातून प्रथम वैष्णवी इंगळेआणि द्वितीय सुरेखा कोळी या विद्यार्थिनींनी भाषण देऊन उपस्थितांची मने जिंकली. रवींद्र चौधरी यांनी सदर कार्यक्रम वांगमय मंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता. याबद्दल या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. आणि बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली . उत्कृष्ट वेशभूषा साहिल शिंदे, अस्मिता चक्रे, समर वाघ, सोनाक्षी झोपे, भावेश कोळी, हिमांशू कोळी, शिरीन पटेल, हर्षल कोळी, योगेश खेडकर ,यांनी पारितोषिक मिळविले. आदिवासी वेशभूषेत रितेश बारेला याने आपल्या बोलीभाषा तून सर्वांशी संवाद साधला. मुख्याध्यापक एस एस वैष्णव , पर्यवेक्षक  डी के पाटील यांनी आपले मनोगत व्यक्तिगत केले. एस बी सपकाळे यांनी फलक लेखन करून शोभा वाढविली. विद्यार्थ्यांची शिस्त कायम राहावी यासाठी सर्व शिक्षक बंधू भगीनिनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नियोजन आणि सहकार्य प्रा योगेश कोष्टी आणि प्रा शीतल तायडे , निलेश देशमुख यांनी केले. तर आभार सौ जे पी चौधरी यांनी मानले. यावेळेस सर्व शिक्षक बंधू भगिनी पालक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *