धुळपिंप्रीत वृक्षारोपण, संवर्धन व जोपासना सोहळा.

धुळपिंप्रीत वृक्षारोपण, संवर्धन व जोपासना सोहळा एक झाड आपल्या कुटुंबासाठी अनोखा उपक्रम


धुळपिंप्री :  कै. बाबुलाल नथ्थु पाटील यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचा कार्यक्रम एक झाड.. आपल्या कुटुंबासाठी… असा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून तब्बल एक हजार झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमात विशेष म्हणजे दोन वर्षात जर आपण झाड जोपासले (जगविल्यास) त्यांना आकर्षक भेटवस्तू लकी ड्रॉ मार्फत देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. डॉ. सतीश भास्करराव पाटील (माजी पालकमंत्री तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पारोळा) यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच डॉक्टर शांताराम दाजीबा पाटील, लोकनियुक्त सरपंच निंबा बाबुलाल पाटील, उपसरपंच अविनाश अशोक पाटील ,सदस्य लोटन जुलाल पाटील, सुरेश साहेबराव पाटील, आधार गुलाब भील, राजू फकीरा कोळी, रमेश भीमराव निकम यासह समस्त ग्रामस्थ मंडळी व सर्व तरुण मित्र मंडळ, आरोग्य कर्मचारी, जि. प. शाळा शिक्षक वृंद, महिला कर्मचारी धुळपिंप्री आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *