देवरे विद्यालयत बैलपोळा सणानिमित्ताने विद्यार्थीनी माती कामातून बनविल्या बैलांच्या प्रतिकृती.

देवरे विद्यालयत बैलपोळा सणानिमित्ताने विद्यार्थीनी माती कामातून बनविल्या बैलांच्या प्रतिकृतीधंगाई कार्य मंडळ संचलित  आप्पा. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण ता.जि.नंदुरबार येथे बैलपोळा सणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी माती कामातून प्रतिकृती तयार करणे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेत विद्यालयातील जवळपास 200 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम विद्यालयात राबवण्यात आला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला.मुले स्वतः सुरेख मातीकाम करत होती.रेखीव,आकर्षक असे बैल प्रतिकृती सहभागी विद्यार्थ्यांनी तयार केलेत.उत्कृष्ट रंगकाम केले.तयार केलेले बैल त्यांना सणाच्या दिवसानिमित्त घरी पूजनासाठी परत दिलेत.सदर प्रतिकृती मधून इ.पाचवी ते सातवी लहान गटातून लक्षद्वीप महेश पाटील प्रथम,द्वितीय वैष्णवी घनश्याम लोहार,हरीशकुमार सुनील पाटील तृतीय क्रमांकाने, राजेश्वरी भरत भील ही उत्तेजनार्थ बक्षीसाची मानकरी ठरलेत.तसेच मोठ्या गटातून इ.आठवी ते दहावी मधून निकिता सुनील पाटील प्रथम,द्वितीय सुवर्णा डिगंबर पाटील व तृतीय दर्शन विकास पाटील,तर उत्तेजनार्थ बक्षीसाची जया किरण पाटील हे मानकरी ठरलेत.विजेत्यांना वही व पेन, शैक्षणिक साहित्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आले.विद्यालयातील उपशिक्षक डी.बी.भारती,म.एस एच.गायकवाड,म.आर.आर.बागुल,एम.एस. मराठे यांनी विद्यार्थ्यांना मातीकाम तसेच रंगकाम कसे करावे याचे विस्तृत माहिती देऊन, माती पासून बैल प्रतिकृती तयारण्यासाठी मार्गदर्शन केले.या कार्यशाळेसाठी उपशिक्षक सी.व्ही.नांद्रे,एम.डी.नेरकर, वाय.डी.बागुल, एस.जी.पाटील एच.एम.खैरनार आदींनी संयोजन व सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *