सातपुड्यात कृषी दिनी सीडबॉलचे रोपण, कृषी अधीक्षक कुर्बांन तडवी यांचा रावेर ऍग्रो असोसिएशन तर्फे अनोखा सत्कार.

सातपुड्यात कृषी दिनी सीडबॉलचे रोपण, कृषी अधीक्षक कुर्बांन तडवी यांचा रावेर ऍग्रो असोसिएशन तर्फे अनोखा सत्कार.

रावेर प्रतिनिधी ; प्रदीप महाराज

पाल ता. रावेर येथे रावेर तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने कृषीदिनानिमित्त व जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांच्या सत्काराच्या निमित्ताने पाल व गारबर्डी परिसरातील ओसाड पडलेल्या टेकड्यांवर पंधरा ते वीस हजार बिया असलेल्या सीडबॉलच्या माध्यमातून ओसाड पडलेल्या रानावर सीडबॉल फेकण्याचं काम करण्यात आले. यावेळी श्री.तडवी साहेब यांच्यासोबत माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ, सातपुडा विकास मंडळाचे संचालक धनंजय चौधरी,जिल्हा कृषी विकास अधिकारी सुरज जगताप, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी विकास बोरसे,जिल्हा मोहीम अधिकारी विजय पवार, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, पंचायत समिती कृषी अधिकारी एल ए पाटील, यांसह यावल तालुक्याचे अध्यक्ष मनोज वायकोळे,माजी अध्यक्ष प्रशांत पाटील,नारायण भंगाळे,बेंडाळे साहेब मुक्ताईनगरचे अध्यक्ष रामभाऊ पाटील, चोपड्याचे प्रदीप अग्रवाल, पालचे उपसरपंच पिंटू पवार, पालचे कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.महेश महाजन यांसह दोन्ही तालुक्यातील कृषी विक्रेते बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गारबर्डी धरणासमोरील ओसाड पडलेल्या माळरानावर सीड बॉल टाकण्यात येऊन याबाबत मोहीम राबविण्यात आली.

यावेळी सातपुडा विकास मंडळाचे संचालक धनंजय भाऊ चौधरी यांनी ही तडवी यांना शुभेच्छा देत ऍग्रो डीलर्स असोसिएशनच्या उपक्रमाबाबत अभिनंदन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद तराळ,विजय पवार, तर कृषी विज्ञान केंद्र, पालमधील सभागृहात जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बांन तडवी यांचा ऍग्रो डीलर्स असोसिएशन तर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी कृषी विक्रेत्यांनी केलेल्या या कार्यक्रमाबद्दल कौतुक करीत असे कार्यक्रम वारंवार घेण्याचे सूचना केली.यावेळी ॲग्रो डीलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, उपाध्यक्ष एकनाथ महाजन, सचिव युवराज महाजन, खजिनदार डॉ. जी एम बोंडे, चंद्रकांत अग्रवाल, भगवान महाजन, रवींद्र बारी, अमोल लोखंडे, प्रफुल बोंडे, मयूर कोंडे, प्रदीप महाजन,चंदन चौधरी,श्रीराम पाटील, विनोद पाटील, जितेंद्र महाजन, यादवेंद्र माळी, व्ही एस पाटील, धीरज पाटील, किरण महाजन, श्रीपाद जंगले, रणजित चौधरी, भालचंद्र चौधरी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पाटील गुरुजी यांनी तर आभार रामभाऊ पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *