आंतर शालेय १७ वर्ष जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलींमध्ये पाचोर्‍याची इशा राठोड व मुलांमध्ये एरंडोलचा संस्कार पवार प्रथम.

आंतर शालेय १७ वर्ष जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलींमध्ये पाचोर्‍याची इशा राठोड व मुलांमध्ये एरंडोलचा संस्कार पवार प्रथम

जळगाव :- आंतर शालेय जिल्हास्तरीय १७ वर्षे आतील बुद्धिबळ स्पर्धेत मुलींमध्ये पाचोर्‍याची इशा राठोड मुलांमध्ये एरंडोल चा संस्कार पवार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कांताई सभागृह येथे झालेल्या आंतर शालेय जिल्हास्तरीय १७ वर्षातील बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात झाली व संध्याकाळी ७ फेऱ्यानंतर स्पर्धेचा समारोप झाला. स्पर्धेत प्रथम ५ आलेल्या मुलं आणि मुलींना जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे पदक देण्यात आली तसेच या प्रथम पाच व मुलं आणि मुलींची निवड विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी करण्यात आली. पारितोषिक वितरण विजय खेळाडूंना पारितोषिक महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे कॅरम चे राष्ट्रीय खेळाडू सय्यद मोहसिन, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव संजय पाटील, प्रवीण ठाकरे, क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मीनल थोरात यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली.


स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून प्रवीण ठाकरे तर सहकार्य करणारे संजय पाटील, प्रशांत कासार आदींनी काम बघितले. अंतिम ५ मुली इशा रवींद्र राठोड, पिके शिंदे हायस्कूल पाचोरा , चेतना विलास सोनवणे श्री गो.से हायस्कूल पाचोरा, तेजस्वी जगन गावित ईसीएस कॉलेज धरणगाव, युक्ती गोविंद कलंत्री प्रताप कॉलेज अमळनेर , अक्षदा दीपक खाचणे, डॉउल्हास पाटील इंग्लिश मीडियम सावदा ता.रावेर अंतिम ५ मुले संस्कार संदीप पवार, न्यू इंग्लिश स्कूल कढोली ता. एरंडोल दुर्वेश भोजू कोळी, किड्स गुरुकुल जळगाव. ओम निलेश दलाल, सरदार जी.जी हायस्कूल रावेर. रायन राहुल चव्हाण, निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा. जयवर्धन पंकज पाटील, बोहरा सेंट्रल स्कूल जामनेर विभागीय पातळीवर निवड झालेल्या दहा खेळाडूंसोबत खुर्चीवर बसलेले डावीकडून रोहित सपकाळे, संजय पाटील, फारुक शेख,प्रवीण ठाकरे, प्रशांत कासार आदि दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *