कढोली येथे ग्रामदैवत मरीमाता भंडारा उत्साहात साजरा.

कढोली येथे ग्रामदैवत मरीमाता भंडारा उत्साहात साजरा

कढोली ता एरंडोल येथे सालाबादप्रमाणे ग्रामदैवत मरी माता चे विधिवत पूजन करून ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण गावाला उडदाची दाळ भाजी व भाकरी चा जेवणाचा आस्वाद देवुन ग्रामदैवत मरी माताभंडारा उत्साहात साजरा करण्यात आला. ही परंपरा गेल्या शंभर दीडशे वर्षापासून सुरू असल्याचे येथील जाणकारांकडून सांगण्यात आले. अशा चांगल्या प्रथेमुळे गावात सर्व समाजात एकोपा टिकून असल्याचेही सांगण्यात आले यावेळी विधानसभेसाठी निवडणुकीला तयारी करत असलेले माजी जि प सदस्य नाना महाजन व भगवान महाजन यांना ग्रामस्थांच्या वतीने आमंत्रित करून त्यांच्या हस्ते मरी माता देवस्थानचे पूजन करण्यात आले यावेळी माजी सभापती मोहन सोनवणे शिवसेना ऊबाठा तालुका उपविभाग प्रमुख विलास पाटील सरपंच किरण नन्नवरे बांभोरी सरपंच सचिन बिर्हाडे, चिंचपूरा सरपंच कैलास पाटील तालुकाध्यक्ष विजय पाटील, प्रवीण पाटील,, बबलु कोळी, निलेश भोई किशोर बडगुजर श्याम बोरसे सागर कोळी भूषण बडगुजर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *