शानदार शतक ठोकून जपानच्या गोलंदाजांचा लोळवले. कर्णधार अमानने भारताची खेळी सावरली.

सध्या भारताचा अंडर १९ संघ दुबईमध्ये अंडर १९ मॅन्स आशिया कप खेळत आहे. भारताचा दुसरा सामना हा जापानशी सारजाह दुबईत रंगला. जापानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी कराताना भारताने जापानला ३४० धावांचे लक्ष्य दिले.  सध्या भारताचा अंडर १९ संघ दुबईमध्ये अंडर १९ मॅन्स आशिया कप खेळत आहे. आशिया कपचा पहिला समाना २९ नोव्हेंपासून दुबईत रंगत असून भारताचा पहिला सामना हा पाकिस्तानविरुद्ध रंगला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला ४४ धावांनी अपयशाला सामोरे जावे लागले त्यानंतर भारत आज दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले. भारताचा दुसरा सामना हा जापानशी सारजाह दुबईत रंगला. जापानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी कराताना भारताने जापानला ३४० धावांचे लक्ष्य दिले.


भारतीय अंडर-१९ संघाचा कर्णधार मोहम्मद अमानने जपानविरुद्ध आश्चर्यकारक कामगिरी केली. एसीसी अंडर १९ आशिया कपमध्ये त्याने अप्रतिम शतक झळकावले. अमनने १०६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. ८१ धावांवर २ विकेट पडल्यानंतर अमन फलंदाजीला आला. त्याने मोठ्या हुशारीने फलंदाजी केली. अमनने योग्य क्रिकेटचे शॉट्स खेळले आणि त्याला धावा काढण्याची घाई नव्हती. ते सेट झाल्यावर. त्यानंतर त्याने आपले खरे रंग दाखवले.

१८ वर्षीय मोहम्मद अमान शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने १०३ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत ११८ चेंडूत नाबाद १२२ धावा केल्या. अमानने आपल्या खेळीत ७ चौकार मारले. तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. जपान अंडर-१९ क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पूर्ण ५० षटके खेळून ६ गड्यांच्या मोबदल्यात ३३९ धावा केल्या. अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेतील कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

आयुष म्हात्रे आणि केपी कार्तिकेनेही झंझावाती अर्धशतक ठोकले

भारताचा सलामीवीर आयुष म्हात्रेने या सामन्यात आपले अर्धशतक (५४ धावा) २७ चेंडूत पूर्ण केले. आयुषनेही आपल्या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार मारले. केपी कार्तिकेयनेही मधल्या फळीत येऊन चांगली फलंदाजी केली. त्याने ४९ चेंडूत ५७ धावा केल्या. आशिया चषकातील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. मात्र, मोठी खेळी खेळताना वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा फ्लॉप झाला. अवघ्या २३ धावांवर तो बाद झाला. भारताने जपानला ३४० धावांचे मोठे लक्ष्य दिले आहे. हार्दिक राजने नाबाद २५ धावा केल्या. आंद्रे सिद्धार्थने ३५ धावा तर निखील कुमारने १२ धावा आणि हरवंश सिंगने १ धावा करुन बाद झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *